Maharashtra Budget 2023 : अंगणवाडी सेविकांसाठी खूषखबर : अर्थसंकल्पात मानधनात भरीव वाढ!

Maharashtra Budget For Anganwadi Servants: अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार
Maharashtra Budget 2023 : Devendra Fadnavis
Maharashtra Budget 2023 : Devendra FadnavisSarkarnama

Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत राज्य सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पादरम्यान,अनेक मोठ्या आणि महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. राज्यातील अंगणवाडी सेविकांकडून वारंवार मागण्या करण्यात येत होत्या. यासाठी अनेक वेळा आंदोलनेही झाली. आजच्या अर्थसंकल्पात अंगणवाडी सेविकांसाठी काही घोषणा करण्यात आले आहेत.

Maharashtra Budget 2023 : Devendra Fadnavis
Maharashtra Budget Session : फडणवीसांची शिवप्रेमींना मोठी भेट; शिवनेरीवर उभारणार शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर संग्रहालय

नव्या उभारत्या पिढीचे आराेग्य आणि संस्कारासाठी काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात प्रथम  आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांसाठी तरतूद करण्यात आली आहे.

आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 रूपयांवरून 5000 रुपये हाेणार आहे. गटप्रवर्तकांचे मानधन 4700 रूपयांवरुन 6200 रुपये करण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 रूपयावरुन 10,000 रुपये होणार आहे. छोट्या अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 रूपयांवरून 7200 रुपये करण्यात येत आहे.  अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 रूपयांवरून 5500 रुपये हाेणार आहे.

Maharashtra Budget 2023 : Devendra Fadnavis
Maharashtra Budget : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मागेल त्याला शेततळे, ठिबक सिंचन देण्याची घोषणा

राज्यात अंगणवाडी सेविकांच्या हजारो जागा रिक्त आहेत, अशी तक्रार नेहमी करण्यात येत असते. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी  अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार असल्याची घोषणा केली आहे. अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली तयार करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com