Maharashtra ATS : पंधरा लाखांचे बक्षीस असलेल्या कुख्यात नक्षलवाद्याला महाराष्ट्र एटीएसने पकडले

वैद्यकीय उपचारांसाठी तो नालासोपाऱ्याला आल्याची माहिती एटीएसला मिळाली होती.
Karu Hulas Yadav
Karu Hulas YadavSarkarnama

मुंबई : सुमारे १५ लाखांचे बक्षीस असलेल्या झारखंड (Jharkhand) येथील कुख्यात नक्षलवाद्याला नालासोपारा येथून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस Maharashtra ATS) ठाणे युनिटने अटक घेतली. कारू हुलास यादव (वय ४५) असे या नक्षलवाद्याचे (Naxalite) नाव असून तो २००४ पासून नक्षली कारवायांमध्ये सक्रिय होता. (Maharashtra ATS arrests a notorious Naxalite in Nalasopara)

Karu Hulas Yadav
‘दामाजी’च्या निवडणुकीपासून दुरावलेले परिचारक-आवताडे समर्थक आले एकाच व्यासपीठावर!

यादव हा मूळचा झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातील कटकमसंडी गावचा रहिवासी असून तो कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या बंदी घातलेल्या संघटनेचा सदस्य आहे. विविध नक्षली कारवाईमध्ये सहभागी असलेला यादव सध्या फरारी असल्याने झारखंड सरकारने त्यांच्यावर १५ लाखांचे बक्षीस ठेवले होते.

दरम्यान, वैद्यकीय उपचारांसाठी तो नालासोपाऱ्याला आल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. त्यानुसार ठाणे युनिटने नालासोपारा परिसरात सर्च ऑपरेशन राबवले. रामनगरच्या एका चाळीवर छापा टाकून यादवला ताब्यात घेण्यात आले. याबाबत झारखंड पोलिसांना कळवण्यात आले असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Karu Hulas Yadav
Nitish Kumar : अखिलेश यादवांची नीतिशकुमारांना मोठी ऑफर; यूपीतून उतरणार लोकसभेच्या आखाड्यात?

झारखंड पोलिस नालासोपाऱ्यात येणार

कारू हुलास यादव हा अनेक नक्षली हल्ल्यात सहभागी असून त्याच्यावर झारखंड सरकारने १५ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. त्यामुळे ठाणे एटीएसची ही कारवाई महत्त्वाची समजली जात आहे. यादवला ताब्यात घेण्यासाठी झारखंड पोलिस सोमवारी (ता. १९ सप्टेंबर) नालासोपाऱ्याला येणार आहे. तत्पूर्वी न्यायालयापुढे हजर करून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती ठाणे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in