
Maharashtra Assembly : "आगामी तीन वर्षांत राज्यातील ३० टक्के कृषी फीडर सौर ऊर्जेवर आणणार असून, यामुळे शेतकऱ्यांना सध्याच्या वीज दरापेक्षा निम्म्या किमतीत वीज मिळेल. यामुळे शेतकऱ्यांना दिवसाही आवश्यक तेवढी मुबलक प्रमाणात वीज मिळेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत दिली.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना फडणवीस बोलत होते. कांदा निर्यातीवर कोणतीही बंदी नाही. उलट गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १६ टक्के निर्यात जास्त झाली आहे. ‘नाफेड’च्या माध्यमातून आतापर्यंत ४५ हजार ७९६ टन कांदा सरासरी ९४२ रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात आला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्याला सरकारने वाऱ्यावर सोडलेले नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.
भाजप- शिवसेना युतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर आठ महिन्यात मोठ्या प्रमाणात निर्णय घेतले. प्रत्येक प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेऊन शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल याकडे, सरकार लक्ष देत आहे. अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना केवळ सात हजार कोटींची मदत केली. मात्र आमच्या सरकारने आठ महिन्यात १२ हजार कोटी रुपयांची मदत दिली याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधले.
महाराष्ट्राकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढत असून यावर्षी राज्य पुन्हा परदेशी थेट गुंतवणुकीमध्ये अव्वल स्थानी येईल. दाओसमध्ये झालेल्या सामंजस्य करारांपैकी ७५ टक्के करारांबाबत प्रगती झाली आहे, असेही फडणवीस म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.