Sushant Singh Rajput Case: आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा ; त्यांचेच नाव का घेतलं जाते ? राणेंचा सवाल

Maharashtra Assembly Live : सुशांत राजपूत, दिशा सॅलियन मृत्यूची केस पुन्हा ओपन करा. दिशाचा पोस्टमोर्टम रिपोर्ट अद्यापही बाहेर आलेला नाही.
Rahul Shewale Sushant Singh Rajput case
Rahul Shewale Sushant Singh Rajput caseSarkarnama

Maharashtra Assembly Live : शिंदे गटाचे (Shinde Group) खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी काल (बुधवारी) विधीमंडळ अधिवेशनात माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

अभिनेता सुशांत राजपूत याच्या मृत्यू (Sushant Singh Rajput) प्रकरणात राहुल शेवाळे यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. याप्रकरणात आज आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी विधीमंडळाच्या परिसरात माध्यमांशी बोलताना केला.

सुशांत राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) A U नावाने 44 फोन आले होते, हा A U म्हणजे आदित्य-उद्धव (Aditya Uddhav Thackeray) असल्याची बिहार पोलिसांनी (Bihar Police) माहिती दिल्याचा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी केला आहे. लोकसभेत (Loksabha) बोलताना शेवाळे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

नितेश राणे म्हणाले, "सुशांत राजपूत मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांचे नाव का घेतलं जातं. फक्त त्यांचेच नाव का घेतलं जाते. एकेकाळी राहुल शेवाळे हे मातोश्रीचे लाडके होते. त्यांनीच हा विषय काढला आहे. शेळावे सांगतात की रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरे यांचे 42 कॉल झाले आहेत," "या प्रकरणातील तपास अधिकारी का बदलला," असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.

Rahul Shewale Sushant Singh Rajput case
Maharashtra Assembly Live : कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करणार का ? ; शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले..

"सुशांत राजपूत, दिशा सॅलियन मृत्यूची केस पुन्हा ओपन करा. दिशाचा पोस्टमोर्टम रिपोर्ट अद्यापही बाहेर आलेला नाही, त्यामुळे आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट केली तर सत्य समोर येईल. ज्याप्रमाणे श्रद्धा वालकर हिच्या खूनप्रकरणी आफताब पुनावाला याची नार्कोटेस्ट होते तशीच आदित्य ठाकरे यांची नार्कोटेस्ट करा," असे नितेश राणे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com