Assembly session : उद्यापासून सुरु होणारं विधिमंडळ अधिवेशन पुढे ढकललं

अधिवेशन 2 आणि 3 जुलै रोजी होणार होते. पण आता ही तारीख बदलली आहे.
Vidhan Bhavan Mumbai, Maharashtra Political Crisis
Vidhan Bhavan Mumbai, Maharashtra Political Crisis Sarkarnama

मुंबई : एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाने काल (गुरुवारी) पहिल्याच बैठकीत एक दोन दिवसीय अधिवेशन (Assembly session) बोलाविण्याचा निर्णय घेतला होता. हे अधिवेशन उद्या आणि परवा म्हणजेत 2 आणि 3 जुलै रोजी होणार होते. पण आता ही तारीख बदलली आहे.

उद्यापासून (ता.२) सुरु होणारे विधानसभेचं अधिवेशन एका दिवसानं पुढे ढकलण्यात आलं आहे. शनिवारी आणि रविवारी म्हणजे 2 आणि 3 जुलैला होणारे अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं आहे. हे अधिवेशन आता 3 आणि 4 जुलै रोजी होणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यपालांनी रविवारी आणि सोमवारी मुख्यमंत्री शिंदे यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. या दरम्यानच विधानसभा अध्यक्षांची निवड देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईच्या याचिकेवर 11 जुलै रोजी होणारी सुनावणी आजच करावी, अशी मागणी शिवसेनेकडून सु्प्रीम कोर्टात करण्यात आली आहे.

Vidhan Bhavan Mumbai, Maharashtra Political Crisis
Sanjay Raut: फडणवीसांनी अडीच वर्षांपूर्वीचं मोठ मन दाखवायला हवं होतं ; राऊतांचा टोला

एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी गुरुवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी शपथ घेतली. गेल्या दहा दिवसांपासून रंगलेल्या राज्यातल्या सत्तासंघर्षाला काल अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (शुक्रवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा देत त्यांच्यावर निशाणाही साधला. राऊतांनी भाजपवरही टीका केली.

राऊत म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माझ्या शुभेच्छा आहेत. पण एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं असं मी म्हणणार नाही, शिवसेना फोडण्याचे प्लॅन पूर्ण झाला आहे. या ना त्या कारणाने मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडेच आहे,"

राऊत यांची आज ईडी चौकशी करणार आहे. मुंबईतल्या पत्राचाळ प्रकरणी ईडीने त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. गेल्या चौकशीत गैरहजर राहिल्यानंतर ते आज ईडी चौकशीसाठी हजर राहणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com