फडणवीसांना राष्ट्रवादीच्या आमदारांची साथ; पोलीस अधिक्षकांवर कारवाईची गृहमंत्र्यांची घोषणा

विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनी सुरात सुर मिसळले.
Dilip Walse Patil, Devendra Fadnavis
Dilip Walse Patil, Devendra FadnavisSarkarnama

मुंबई : विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Assembly Session) सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनी सुरात सुर मिसळले. जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्वावरून विधासनभेत जोरदार चर्चा झाली. फडणवीस यांनी चर्चेला सुरूवात केल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) आणि संदीप क्षीरसागर (Sandeep Kashirsagar) यांनीही हा मुद्दा उचलून धरला. भाजपच्या आमदार नमिता मुंदडा (Namita Mundada) यांनी आपल्यावर ओढवलेला प्रसंग सभागृहात सांगितल्यानंतर भाजपच्या सदस्यांनी जोरदार गदारोळ केला.

बीड (Beed) जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या मुद्यावर राष्ट्रवादीच्या आमदारांसह फडणवीस यांनीही लक्षवेधी दाखल केली होती. चर्चेत सहभागी घेतलेल्या सर्वच सदस्यांनी जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकांवर कारवाईची मागणी केली. सुरूवातीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून पंधरा दिवसांत अहवाल सादर झाल्यानंतर कारवाई केली जाईल, असं आश्वासन सभागृहाला दिलं. पण या उत्तरावर समाधान न झाल्याने भाजपच्या सदस्यांनी गदारोळ घालण्यास सुरूवात केली. त्यानंतर वळसे पाटील यांनी पोलीस अधिक्षकांना रजेवर पाठवून चौकशी करण्याची घोषणा केली.

Dilip Walse Patil, Devendra Fadnavis
पेडणेकर अन् यशवंत जाधवांपासून मुंबईकरांची मुक्तता होणार!

चर्चेदरम्यान फडणवीस म्हणाले, बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था खराब झाली आहे. सत्तारूढ पक्षाचे संबंधित पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात गोळीबार करतात. 2020 मध्ये 686 चोरीचे गुन्हे दाखल आहेत. 2021 मध्ये 1256 गुन्हे तर उघडकीस 353 गुन्हे उघडकीस आले आहेत. वाळू माफियांचे भयानक काम सुरू आहे. पंकजा मुंडे यांनी गृहमंत्र्यांना पत्र पाठवून विनंती केली आहे. कायदा-सुव्यवस्थेवर स्वतंत्र बैठकीची मागणी केली आहे. गुन्हेगारांकडे पिस्तुले आली आहेत. बीड जिल्ह्यात गृहखातं अस्तित्वात नाही.

बीड जिल्ह्यात आज सर्व अवैध धंदे सुरू आहेत. मटका, गुटखा सुरू आहे. वाळूचे उत्खनन सुरू आहे. दरोडे, चोऱ्या होत आहेत. निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. पोलिस खात्याची प्रतिमा मलिन झाली आहे. या घटनांना पोलीस प्रशासनाचे प्रमुख, पोलीस अधिक्षक जबाबदार आहेत. पोलीस खात्यात झालेल्या बदल्यांमध्येही मोठा भ्रष्टाचार झाला आहे. पोलीस अधिक्षकांच्या कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी सोळंके यांनी केली. माझ्या मतदारसंघातही अशीच स्थिती आहे. सट्टा, मटका, पत्याचे क्लब, अवैध वाळूउपसा, वेश्याव्यवसाय सुरू झाला आहे. सर्वसामान्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. सावकारीचा धंडा खूप वाढला आहे. पोलीस अधिक्षकांकडे तक्रार देऊनही लक्ष दिले गेले नाही, असं संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.

Dilip Walse Patil, Devendra Fadnavis
प्रभाग रचनेचे अधिकार राज्य सरकार स्वतः कडे घेणार ; निवडणुका पुढे ढकलणार..

नमिता मुंदडा यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर ओढवलेला प्रसंग सांगितला. कुटुंबासोबत ऊसाचा रस पिण्यासाठी गेलेल्या असताना काही दारूड्यांनी हुल्लडबाजी केल्याचे त्यांनी सांगितले. पण त्याबाबत पोलीस अधिक्षकांकडून दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मुंदडा यांनी केली. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनीही संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर वळसे पाटील यांनी पोलीस अधिक्षकांना रजेवर पाठवून चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com