विधिमंडळ अधिवेशनाची तारीख बदलली; मंत्रिमंडळ विस्तारामुळे निर्णय घेतल्याची चर्चा

Maharashtra Assembly Session : संसदेचे पावसाळी अधिवेशन मात्र १८ जुलैपासूनच
Maharashtra Assembly session
Maharashtra Assembly sessionsarkarnama

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Session) पुढे ढकलण्यात आले असून नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी याबाबतची माहिती दिली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पावसाळी अधिवेशन १८ जुलै २०२२ पासून सुरू होईल असे सांगण्यात आले होते. मात्र संसदीय कार्यविभागाच्या सुचनेनूसार आता हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. अधिवेशनाची तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नसून संसदीय कार्य विभागाने कळविल्यानंतर पुढची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. (Maharashtra Assembly Session Latest news)

१८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक देखील होणार आहे. त्यामुळे विधानसभेचे आमदार त्यादिवशी मतदानासाठी सभागृहात हजेरी लावणार असून अधिवेशनासाठी पुन्हा मुंबईत यावे लागण्याची शक्यता आहे. त्याचवेळी संसदेचे पावसाळी अधिवेशन मात्र १८ जुलैपासूनच सुरु होणार आहे. मतदानाच्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे १९ जुलैपासून सभागृहाचे नियमित कामकाज सुरु होणार आहे.

दरम्यान अधिवेशन पुढे ढकलण्याच्या निर्णयामागे लांबलेला मंत्रिमंडळाचा विस्तार असल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून राजीनामा दिल्यानंतर ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर ४ जुलै रोजी विशेष अधिवेशनात शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव देखील जिंकला. यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. (Maharashtra Assembly Session Latest news)

मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी आषाढी एकादशीनंतर आणि अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे सांगितले होते. मात्र आता शपथ घेवून, विश्वासदर्शक ठराव जिंकून दोन आठवडे उलटल्यानंतर देखील अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलेला नाही. यावर सरकारला १६५ आमदारांचा पाठिंबा असून देखील मंत्रिमंडळाचा विस्तार का होत नाही? अडचण काय आहे? घोड कुठं पेंड खातयं, असा खोचक प्रश्‍न विचारत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी टीका केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in