Maharashtra Assembly Live : विधिमंडळावर 'ही' यात्रा धडकणार

Maharashtra Assembly Live : २००५ नंतर नियुक्त सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, ही प्रमुख मागणी या कर्मचाऱ्यांची आहे.
Devendra Fadanvs and Eknath Shinde
Devendra Fadanvs and Eknath ShindeSarkarnama

Maharashtra Assembly Live : राजस्थान, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, झारखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू आहे, तर पुरोगामी प्रगत म्हणणाऱ्या महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना लागू का होत नाही, हा संतप्त प्रश्न सरकारला विचारण्यासाठी विविध विभागातील कर्मचारी जुनी पेन्शन संघटनेच्या माध्यमातून नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावर संकल्प यात्रा (pension sankalp yatra) काढणार आहेत.

ठाणे जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पेन्शन संघटनेच्या ठाणे जिल्हा शाखेने केले आहे. सेवाग्राम वर्धा येथील बापू कुटी पासून येत्या २५ डिसेंबरला या यात्रेस सुरुवात होणार आहे. २७ डिसेंबरला विधिमंडळावर ही यात्रा धडकणार आहे. एक नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, ही प्रमुख मागणी या कर्मचाऱ्यांची आहे.

मागील सात वर्षांपासून राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर हिवाळी अधिवेशन, मुंबई येथील आझाद मैदान येथे मोर्चे, धरणे अशा विविध आंदोलनाच्या माध्यमातून कर्मचारी एनपीएस ला विरोध करीत असून जुनी पेन्शन योजनेची मागणी करीत आहेत.

एनपीएस योजना ही शेअर बाजारावर आधारित असल्याने या योजनेतून मिळणारी पेन्शन ही अनिश्चित स्वरूपाची आहे. या योजनेत निवृत्ती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या वारसांना जुन्या पेन्शन योजने प्रमाणे लाभ मिळत नसल्याचे उघड झाल्याने कर्मचाऱ्यांचा या योजनेस विरोध होताना दिसत आहे.

हिवाळी अधिवेशनाचा आजचा (शुक्रवार)पाचवा दिवस वादळी ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन केल्याचे पडसाद आज पुन्हा विधानसभेच्या कामावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विरोधकांकडून आजच्या कामकाजावर बहिष्कार घातला जाण्याची शक्यता आहे. विधानसभेतील कामकाजावर बहिष्कार घालत विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून दिवसभर आंदोलन होण्याची शक्यता आहे.

Devendra Fadanvs and Eknath Shinde
Maharashtra Corona : मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना दिल्या 'या' महत्वाच्या सूचना

गुरुवारी विधीमंडळ अधिवेशनाचा चौथा दिवस चांगलाच वादळी ठरला. रश्मी शुक्ला फोन टॅपिंग, सुशांतसिंह राजपूत, दिशा सॅलियन या प्रकरणाने गुरुवारचा दिवस वादळी ठरला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com