Maharashtra Assembly : जयंत पाटलांनी उच्चारलेल्या 'त्या' शब्दाबाबत अजित पवारांनी स्पष्टचं सांगितलं..

Maharashtra Assembly Live : ३२ वर्षांचा अनुभव असलेल्या आमदाराला निलंबित करण्यात आल्याने राष्ट्रवादी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली.
Ajit Pawar Latest Marathi News
Ajit Pawar Latest Marathi NewsSarkarnama

Maharashtra Assembly Live : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी गुरुवारी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला आहे. यावरुन सभागृहात गोंधळ झाला. जयंत पाटलांनी वापरलेला 'निर्लज्ज" शब्द असंसदीय असल्याने त्यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे.

निलंबन प्रकरणावरून विरोधी पक्षाने काल सभात्याग केला. आजही (शुक्रवारी) विरोधकांनी सभागृहात न जाता विधीमंडळाच्या पायऱ्यावर बसून शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध केला. ३२ वर्षांचा अनुभव असलेल्या आमदाराला निलंबित करण्यात आल्याने राष्ट्रवादी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली.

जयंत पाटलांनी वापरलेला तो शब्द कुणाविषयी होता, याबाबत अजित पवारांनी स्पष्टीकरण केलं आहे. अजित पवार सकाळी विधीमंडळ परिसरात माध्यमांशी बोलत होते. अजित पवार म्हणाले, "जयंत पाटलांनी उच्चारलेला 'निर्लज्ज' हा शब्द सभापतींसाठी नव्हता,"

Ajit Pawar Latest Marathi News
Ajit Pawar : शिंदे-फडणवीस गप्प का ? ; अजितदादा संतापले, म्हणाले, 'आज सभागृहात..'

विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू

विधानसभेतील कामकाजावर विरोधकांनी बहिष्कार घालतला आहे. विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन सुरू आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री एकही इंच जागा देणार नाही, असा ठराव करुन मोकळे झाले आहेत. तर महाराष्ट्र सरकार अजूनही गप्प का असा सवाल विरोधी पक्षनेतेअजित पवार यांनी उपस्थित केला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री जशी त्यांची भूमिका आक्रमकपणे मांडत आहे तशी भूमिका आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री का मांडत नाही असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला आहे.

Ajit Pawar Latest Marathi News
Maharashtra Assembly Live : आदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या राहुल शेवाळेंची SIT चौकशी होणार

राष्ट्रवादी आक्रमक

आज दोन्ही सभागृहातील कामकाजात विरोधक सहभागी होणार नाहीत.विधीमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. सीमाप्रश्नावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. तीन दिवसांपासून राज्यातील विविध प्रश्नांवर विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा घडत आहे. यातच जयंत पाटील यांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन केल्याने राष्ट्रवादी आक्रमक झाली असून राज्यभर आंदोलन करणार आहे. याचे पडसाद विधानभवनात देखील उमटत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com