Maharastra Assembly | मोठी बातमी : किरीट सोमय्यांचा पाय खोलात ; परबांनी आणला हक्कभंग प्रस्ताव!
मुंबई : विरोधकांवर नेहमीच आरोप करणारे, घोटाळे उघडकीस आणणारे माजी खासदार व भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्याच अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. माजी परिवहन मंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी आज विधान परिषदेच्या सभागृहात किरीट सोमय्या यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला आहे.
अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांच्यासोबतच म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद बोर्डीकर यांच्याविरोधातही हक्कभंग प्रस्ताव मांडलेला आहे तसेच, किरीट सोमय्या यांनी आपल्यावर खोटे आरोप करून, आपली बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे, असं देखील परब यांनी मुद्दा मांडला आहे. आता या हक्कभंग मालिकेवरून राज्याचं राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अनिल परब यांनी म्हाडाची असलेला जमीन हडपली असा थेट सोमय्या यांनी केला. या आरोपामुळे आपला काही संबंध नसताना, आपसी विनाकारण बदनामी झाली असे सांगत परब यांनी हक्कभंग प्रस्ताव मांडलेला आहे. आता हा मांडलेला हक्कभंगाचा प्रस्ताव विधिमंडळाच्या विशेष हक्क समितीकडे पाठवण्यात यावा, अशी विनंती परब यांच्याकडून करण्यात आलेली आहे. यावर आता समिती काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वपूर्ण आहे.
अनिल परब नेमकं काय म्हणाले?
"महाराष्ट्र राज्य विधान परिषद नियम २४१ नुसार सदस्य म्हणून मी विशेष हक्कभंगाची सूचना करत आहे. म्हाडाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोर्डीकर तसेच, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात मी हक्कभंगाची सूचना करत आहे. या प्रकरणीआपण पुढील चौकशी आणि कार्यवाही व्हावी म्हणून विशेष हक्क समितीकडे पाठवावे, अशी विनंती करत आहे", असे परब य़ांनी म्हंटले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.