Amol Mitkari News: अमोल मिटकरींनी आमदार कराड यांना ओळखलेच नाही; अन् झाला घोटाळा !

Neelam Gorhe : निळा शर्ट घातलेली व्यक्ती कोण? सभापतींनी केला खुलासा..
Amol Mitkari ; Neelam Gorhe : Ramesh Karad
Amol Mitkari ; Neelam Gorhe : Ramesh KaradSarkarnama

Maharashtra Assembly : राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू आहे. या दरम्यान विधानपरिषद सभागृह संबंधातली एक बातमी चांगलीच चर्चेत होती. सभागृहात एक संशयित व्यक्ती येऊन बसली होती, अशी तक्रार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे एका कागदावर लेखी स्वरूपात तक्रार दिली होती. आता यावर खुद्द गोऱ्हे यांनीच खुलासा केल्यानंतर ही संशयित व्यक्ती नसून, सभागृहाचे सन्माननीय सदस्य रमेश कराड होते, हे स्पष्ट झाले आहे. १० मार्च रोजी हा प्रकार घडून आला होता.

Amol Mitkari ; Neelam Gorhe : Ramesh Karad
Sushma Andhare News : महाराष्ट्रात ठाकरेंच्या शिवसेनेचे शंभर आमदार निवडून येणार..

विधानपरिषदेत याप्रकरणी खुलासा करताना नीलम गोऱ्हे यांनी म्हंटले की, "काही लोकं विधीमंडळात अभ्यासासाठी येतात, काही लोकं कामकाज बघायला येतात. त्यांना आपण परवानगी दिली पाहिजे. १० मार्च रोजी आमदार अमोल मिटकरी यांनी माझ्याकडे तक्रार केली होती, सभागृहात निळा शर्ट परिधान केलेली, एक संशय़ित व्यक्ती कामकाज सुरू असताना सभागृहात बसली होती."

Amol Mitkari ; Neelam Gorhe : Ramesh Karad
Budget Session : शिंदे सरकार आल्यापासून कर्नाटकची दादागिरी वाढली, जाब विचारणार की नाही ?

"या तक्रारीमुळे मला काही तासांतच अनेक वृत्तवाहिन्यांचे फोन आले. सभागृहात कोण व्यक्ती आली होती, अशी विचारणा मला माध्यमांनी केली. याबाबतीत मी सुरक्षा अधिकाऱ्यांना सांगितलं. मी माध्यमांना विनंती केली बातमी लावू नका, अजून शहानिशा झाली नाही. पण कर्तव्यदक्ष माध्यमांनी ऐकंल नाही. त्यांनी याचे फुटेजही दाखवले. निळा शर्ट परिधान केलेली व्यक्ती कोण कोण होती? हे पाहिल्यानंतर कळलं की, ती व्यक्ती आमदार रमेश कराड आहेत. पण मिटकरी यांनी रमेश कराड यांना ओळखलंच नाही. त्यांनी ती दुसरी व्यक्ती वाटली," असे सभापती गोऱ्हे म्हणाल्या.

"मिटकरींना कराड हे अज्ञात व्यक्ती का वाटावी? असा प्रश्न मला आहे. कराडांना मिटकरींना ओळखलं नाही. यामध्ये विधानभवन सुरक्षेची त्रुटी नसून, मिटकरी यांच्याकडून अनवधाने काही गोष्टी घडलेल्या आहेत," असे सभापती गोऱ्हे म्हणाल्या.

Amol Mitkari ; Neelam Gorhe : Ramesh Karad
Assembly Session : बननदादा फडणवीसांच्या, तर संजयमामा अजितदादांच्या पाठीशी : शिंदे बंधूंच्या विधानसभेतील बसण्याची चर्चा

सभापतींच्या खुलाश्यानंतर मिटकरी म्हणाले, "मी सभागृहाला प्रामाणिकपणे सांगतो, मी इतर सदस्यांना विचारलं की, कोण आहे ही व्यक्ती? इतर सदस्य ही म्हणाले, की आमच्याही परिचयाचे नाहीत. यानंतर मी सभापतींना पत्र लिहलं की, ही व्यक्ती सभागृहाची सदस्य आहे की नाही,याबद्दल अवगत करा. याबद्दल मी मिडीयाला सांगितलं नाही. विधानभवनच्या एका अधिकाऱ्याकडून मला जो फोटो आला, मी त्यांना सांगितलं की, ही व्यक्ती ती नाही . निळा शर्ट होता. म्हात्रे, श्रीकांत भारतीय असे दोन तीन सदस्यांनी निळा शर्ट परिधान केला होता ."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in