दिवाळीच्या तोंडावर वाहनचालकांसह गृहिणींचं बजेट कोलमडलं!
Mahanagar GasFile Photo

दिवाळीच्या तोंडावर वाहनचालकांसह गृहिणींचं बजेट कोलमडलं!

ऐन दिवाळीच्या तोंडावर सीएनजी आणि स्वयंपाकाच्या पीएनजीची दुसरी दरवाढ झाली आहे.

मुंबई : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Petrol) दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर देशात ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. यातच आता ऐन दिवाळीच्या तोंडावर महानगर मुंबईसह इतर ठिकाणी गॅसने सीएनजी (CNG) आणि स्वयंपाकाच्या पाईप्ड नॅचरल गॅसची (PNG) दरवाढ केली आहे. याआधी 4 ऑक्टोबरलाही सीएनजी आणि पीएनजीची दरवाढ करण्यात आली होती.

केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या दरात तब्बल 62 टक्के वाढ केली आहे. यामुळे महानगर गॅसने सीएनजीच्या दरात चालू महिन्यात दुसऱ्यांदा वाढ केली आहे. ही वाढ प्रतिकिलो 2.97 रुपये आहे. दोन आठवड्यांत सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 5.56 रूपये वाढ झाली आहे. यामुळे स्वस्त इंधनाचा पर्याय म्हणून सीएनजीकडे वळणाऱ्या वाहनचालकांना भुर्दंड बसू लागला आहे. आता सीएनजीचा दर प्रतिकिलो 57.54 रुपयांवर गेला आहे.

स्वयंपाकाच्या पाईप्ड नॅचरल गॅसच्या (PNG) दरात या महिन्यात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. पीएनजीच्या दरात प्रति घनमीटर 1.26 रुपये वाढ करण्यात आली आहे. मागील दोन आठवड्यांत सीएनजीच्या दरात घनमीटरमागे 3.35 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे पीएनजीचा दर प्रतिघनमीटर 33.93 रुपयांवर गेला आहे. आता दिवाळीपर्यंत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात आणखी वाढ होण्याचे संकेत आहेत.

Mahanagar Gas
पेट्रोल, डिझेल आणखी महागणार; चालू महिन्यात बारावी दरवाढ

देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. पेट्रोलच्या दराने देशभरात शंभरी ओलांडली आहे. आता डिझेलच्या दरानेही शंभरी ओलांडण्यास सुरवात केली आहे. अशातच स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder) दरातही वाढ सुरू आहे. चालू वर्षात एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 205 रुपयांची वाढ झाली आहे. दिल्ली आणि मुंबईत विनाअंशदानित गॅस सिलिंडरची किंमत 900 रुपयांवर पोचली आहे.

Mahanagar Gas
भाजपनं डच्चू दिलेल्या वरूण गांधींचे वाजपेयींच्या आडून पक्षालाच आव्हान

देशातील चार राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर 2 मेपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. यामुळे सामान्य नागरिकांना इंधन दरवाढीचे चटके बसत आहेत. देशात 4 मे ते 17 जुलै या कालावधीत पेट्रोलच्या दरात 11.44 रुपये आणि डिझेलच्या दरात 9.14 रुपये वाढ झाली आहे. मागील दोन आठवड्यांत 13 वेळा आणि तीन आठवड्यांत 16 वेळा पेट्रोल, डिझेलची दरवाढ झाली आहे. 24 सप्टेंबरपासून पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 4.9 रूपये आणि डिझेलच्या दरात 3.9 रूपये वाढ झाली आहे.

Related Stories

No stories found.