BJP-RSP Politics: बावनकुळेंच्या जागा वाटपाच्या वक्तव्यावरुन राजकारण तापणार; जाणकरांचा स्वबळाचा नारा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात भाजप २४० जागा लढवणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते
BJP-RSP Politics:
BJP-RSP Politics:Sarkarnama

BJP-RSP Politics: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात भाजप २४० जागा लढवणार असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावरुन सारवासारवही केली. पण आता त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी त्यावर प्रतिक्रीया दिली आहे. ''भाजप आणि शिंदे गट एकत्र मिळून आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूका लढवणारअसेल तर आम्हाला हरकत नाही. आम्ही स्वबळावर लढू,अशी भूमिका राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी मांडली आहे.

BJP-RSP Politics:
Pankaja Munde : पराभव झाल्याने खूप शिकायला मिळालं; पंकजा मुंडेंनी सांगितल्या अनुभवाच्या गोष्टी

"महाराष्ट्रात आतापर्यंत रासपचे चार आमदार झाले.त्यात आता आम्ही दोघे आमदार आहोत. मी विधान परिषदेचा सदस्य असून आमच्याकडे राज्यातील 98 जिल्हा परिषदा आहेत.चार राज्यात रासपला मान्यता मिळाली आहे. आसाम आणि कर्नाटकातील एक-एक जिल्हा परिषद रासपच्या ताब्यात आहे. गुजरातमध्येही रासपचे 28 नगरसेवक आहेत. असे असतानाही जर भाजपला आमची गरज नसेल तर आम्ही स्वतंत्र लढण्यासाठी तयार आहोत," अशी भूमिका महादेव जानकर यांनी घेतली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागा वाटपाच्या विधानावरुन सध्या राजकारण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहे.2024 विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढवण्याच्या तयारीत असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 50 हून अधिक जागा लढवण्यासाठी चांगले उमेदवार नाहीत.

शिवाय भाजपला शिंदे गटासह इतर मित्रपक्ष आणि अपक्षांसाठीही काही जागा सोडाव्या लागतील. तर शिंदे गटाकडे या 40 आमदार आणि काही अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे विद्यमान आमदारांच्या जागा सोडल्या तर भाजप शिंदे गटासाठी जास्त जागा सोडणार नाही. असं बावनकुळे यांनी म्हटलं होतं. पण त्यांच्या या वक्तव्यामुळए वाद निर्माण होऊ शकतो, हे जाणवल्यावर त्यांनी सारवासारवही केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in