महाबळेश्वर, पाचगणीत घोडेस्वारी, नौकाविहारला परवानगी

घोडेस्वारी करतांना घोडेव्यावसायिक यांनी मास्क, ग्लोब्ज, फेस शिल्ड, सॅनिटायझर व सुरक्षा साधनांचा वापर करावा. पर्यटकांना देखील मास्क ग्लोब्ज, फेस शिल्ड, सॅनिटायझर व सुरक्षा साधने वापरणे बंधनकारक आहे. घोडेस्वारीच्या दरम्यान मानवी संपर्क होत असलेल्या वस्तू निर्जंतूक करण्यात याव्या. ज्या ठिकाणी घोडे स्वारीसाठी परवानगी देण्यात आलेली आहे त्याच ठिकाणी घोडेस्वारी करण्यात यावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
Mahabaleshwar Veena Lek and Hore riding
Mahabaleshwar Veena Lek and Hore riding

सातारा : महाबळेश्वर व पाचगणी येथील काही पॉईंटसह घोडेस्वारी तसेच महाबळेश्वर येथील वेण्णालेक बोट क्लब येथे नौका विहार पर्यटनासाठी खुले करण्यास तसेच व्यवसाय सुरु करण्यास जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काही अटीशर्तींवर परवानगी दिली आहे. 

महाबळेश्वर व पांचगणी ही दोन्ही पर्यटनस्थळे मार्चपासुन बंद आहेत. पर्यटकांअभावी येथील छोटया व्यवसायिकांची उपासमार होवु लागली होती. राज्यात अनलॉक चार लागु झाला असुन सर्वत्र व्यवसाय टप्प्या टप्प्याने सुरू झाले. परंतु, पर्यटनस्थळ महाबळेश्वर व पांचगणी येथील व्यवसाय बंदच होते. घोडे व्यवसायिक टॅक्‍सी व्यवसायिक व येथील छोटे मोठे व्यवसाय करणारे व्यापाऱ्यांनी आमदार पाटील यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काही अटीशर्तींसह परवानगी दिली आहे. 

महाबळेश्वर नगरपालिकेने घोडेस्वारांना एक दिवसाआड 50 टक्के घोडस्वारांचे नियोजन करुन देणे बंधनकार राहिल. दररोज प्रत्येक पर्यटकांची नोंद नोंदवहीत ठेवणे बंधनकारक राहिल. जी पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी खुली नाहीत, अशा ठिकाणी घोडेस्वारी करण्यास मनाई राहिल. घोडेस्वारीसाठी वारपण्यात येणाऱ्या घोड्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र बंधनकारक राहील. व्यवसाय सुरु करण्यापूर्वी घोडे चालक अथवा मालक यांची कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे.

घोडेस्वारीसाठी नगरपरिषद परवाना व बॅचक्रमांकं असणे आवश्यक आहे. देण्यात येणारा बॅच क्रमांक दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. संघटनेमार्फत घोड्यांना क्रमांक देण्यात व दिलेल्या क्रमांकानुसाराच घोडेस्वारी करणे बंधनकारक आहे. कोणत्या ही प्रकारची गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी. ज्या पर्यटकांचे तापमान 38 सेल्सिअस किंवा 100.4 फॅरनाईट पेक्षा जास्त आहे. ऑक्सिजन पातळी 95 पेक्षा कमी असल्यास अशा पर्यटकांना घोडेस्वारी करण्यापासून प्रतिबंध करावा.

तापमान जास्त अथवा ऑक्सिजन पातळी कमी असल्यास संबंधित व्यक्तीस रुग्णालयामध्ये दाखल करावे. ज्या पर्यटकांना कोविड-19  सदृश्य लक्षणे असल्यास घोडेस्वारीसाठी प्रतिबंध करण्यात यावा. संघटनेने येणाऱ्या पर्यटकांचे नांव, पत्ता, वय, तापमान, मागील 14 दिवसांच्या प्रवासाची माहितीची नोंद रजिस्टरमध्ये करावी. घोडे चालक व मालक यांची प्रत्येक 15 दिवसांनी कोविड चाचणी करणे बंधनकारक आहे.

घोडेस्वारी करतांना घोडेव्यावसायिक यांनी मास्क, ग्लोब्ज, फेस शिल्ड, सॅनिटायझर व सुरक्षा साधनांचा वापर करावा. पर्यटकांना देखील मास्क ग्लोब्ज, फेस शिल्ड, सॅनिटायझर व सुरक्षा साधने वापरणे बंधनकारक आहे. घोडेस्वारीच्या दरम्यान मानवी संपर्क होत असलेल्या वस्तू निर्जंतूक करण्यात याव्या. ज्या ठिकाणी घोडे स्वारीसाठी परवानगी देण्यात आलेली आहे त्याच ठिकाणी घोडेस्वारी करण्यात यावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

रस्त्यावर घोडेस्वारीच्या ठिकाणी अथवा सार्वजनिक ठिकाणी घोड्यांची विष्टा पसरणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.  वेण्णालेक बोट कल्ब येथे नौका विहारासाठी पालिकेने दर दिवशी एका बोटीच्या फक्त दोन फेऱ्या होतील, एवढ्याच फेऱ्यांचे नियोजन करावे. बोटिंग क्लबच्या ठिकाणी सामाजिक अंतर पाळणे, बोटी सॅनिटाईज करणे, पर्यटकांना सुरक्षिततेच्या सुचना देणे, मास्क व सॅनिझाटयझरचा वापर आदी सर्व नियोजन करण्याची जबाबदारी नगरपालिकेची राहिल.

बोटिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांना सामाजिक अंतर राखणेबाबत सूचित करण्यात यावे. रांग पध्दतीचा अवलंब करण्यात यावा. बुकिंग ऑफिसच्या ठिकाणी सामाजिक अंतर राखण्यासाठी एक मीटर अंतरावर खुणा करुन घ्यावी. ऑनलाईन बुकिंग करीता प्राधान्य देण्यात यावे. बुकिंग ऑफिस येथे पर्यटकांना ई-पेमेंट सुविधा देण्यात यावी. बोटिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांचे प्रवेशद्वाराजवळ सामाजिक अंतर राखून तपासणी करण्यात यावी.

यामध्ये पर्यटकांचे तापमान, ऑक्सिजन पातळी तपासणी करण्यात यावी. बोटिंगसाठी यणाऱ्या पर्यटकांचे नाव, पत्ता, वय, तापमान व मागील 14 दिवसांच्या प्रवासाची माहितीची नोंद रजिस्टरमध्ये करण्यात यावी. एका बोटीत एकाच कुटुंबातील व्यक्तींना प्रवेश देण्यात यावा. एका बोटीमध्ये जास्तीत जास्त सहा पर्यटक व एक चालक यापेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश देण्यात येऊ नये.

नौका विहाराच्या ठिकाणी गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी. सहली अथवा मोठया समूहांना (ग्रुप) बोटिंगसाठी परवानगी देण्यात येऊ नये. प्रत्येक फेरीच्या वेळी बोट निर्जंतुक करणे बंधनकारक आहे. वेळोवेळी शासनमार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्यात यावे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com