Mahavikas Aghadi News: आघाडीचा घोळ मिटेना; सूत्र पवारांच्या हातात, उद्धव ठाकरे अन् संजय राऊतांशी चर्चा

MVA News: महाविकास आघाडीची आज बैठक
Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi Sarkarnama

Graduate Constituency Elections : विधान परिषदेच्या नाशिक, अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ आणि औरंगाबाद, नागपूर, कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून राज्यात नाट्यमय घडामोडी घडत आहेत.

असे असतानाच नाशिक आणि नागपूरच्या जागेवरून महाविकास आघाडीचा घोळ काही मिटताना दिसच नाहीये. नाशिक पदवीधरसाठी काँग्रेसकडून उमेदवारी मिळूनही सुधीर तांबेंनी अर्ज न भरल्याने आघाडीत गोंधळ उडाला आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याशी फोनवरून चर्चा केली असल्याचे राऊतांनी सांगितले. तसेच विधान परिषदेच्या या निवडणुकीबाबत समन्वय नसल्याचे दिसून आल्यामुळे या सर्व विषयांवर आज बैठक होणार आहे. या बैठकीत सर्व घडामोडींवर चर्चा करण्यात येणार असून त्यानंतर मविआची अंतिम भूमिका निश्चित होणार असल्याचे राऊतांनी सांगितले.

Mahavikas Aghadi
Satyajit Tambe News : वडिलांची आमदारकी हिसकावली; पक्षाशी बंडखोरी : आमदारकीसाठी सत्यजीत तांबेंचे गुडघ्याला बाशिंग

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारीची अधिकृत घोषणा झाली होती. मात्र, ऐनवेळी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला नाही. तर त्यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरला.

त्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली होती. याच कारणावरून डॉ. सुधीर तांबे यांच्या चौकशीचे आदेश काँग्रेस हायकमांडकडून देण्यात आलेत. तसेच सत्यजीत तांबे यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

या सर्व घडामोडीनंतर महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) समन्वय नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. हा सर्व घोळ मिटवण्यासाठी आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार असून त्यानंतर यावर पडदा पडणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

Mahavikas Aghadi
Marathwada Teacher Constituency : राष्ट्रवादीत बंडखोरी, अजित पवारांनी सांगूनही सोळुंकेची माघार नाहीच..

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात पाच जागांपैकी काँग्रेसने अमरावती आणि नाशिक मतदारसंघावर दावा केला. मात्र, नाशिकमध्ये काँग्रेस तोंडघशी पडली. उमेदवारी देऊन देखील सुधीर तांबेंनी अर्ज दाखल केला नाही.

तेथे त्यांचा मुलगा सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. त्यामुळे काँग्रेसमध्ये सुरू असलेला घोळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला.तसेच यानंतर काँग्रेसकडून सुधीर तांबे यांचं निलंबन करण्यात आलं.

नाशिकमध्ये शिवसेनेने (ठाकरे गट) शुभांगी पाटील यांना पाठिंबा दर्शवला. त्यामुळे आता आघाडीत असणारे राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) हे दोनही पक्ष त्यांना पाठिंबा देणार का? असा प्रश्न पुढे आला. त्यानंतर आज आघाडीची बैठक पार पडणार आहे.

Mahavikas Aghadi
Satyajeet Tambe News : सत्यजित तांबेंनी काँग्रेसशी असलेले नाते तोडले : सोशल मीडियावरील डीपी बदलला, पदांचा उल्लेख हटवला

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

काँग्रेस ज्या उमेदवाराला पाठिंबा देणार त्याला तुमचा (ठाकरे गट) पाठिंबा असणार का?, असा प्रश्न संजय राऊतांना (Sanjay Raut) विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, "यासंदर्भात आज आम्ही दुपारी बैठक घेणार आहोत. त्यानंतर नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघात कोणता निर्णय घ्यावा? तसेच नागपूरला शिक्षक मतदारसंघात कोणती भूमिका घ्यावी? हे आज बैठकीनंतर ठरेल. याबाबत शरद पवार यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणं झालं आहे. तसेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्येही चर्चा झाली. त्यामुळे आज याबाबत सर्व स्पष्ट होणार आहे'', असं ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in