Love Jihad : नवा कायदा येणार ; अधिवेशनात मांडणार विधेयक : अनिल बोंडे

Anil Bonde : आंतरधर्मीय विवाह कायद्यात सुधारणा करण्याची गरज आहे. आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांच्या पालकांना आधी सूचना दिली जावी.
Love Jihad News, Uttar Pradesh Latest News
Love Jihad News, Uttar Pradesh Latest NewsSarkarnama

अमरावती : ‘आंतरधर्मीय विवाह कायद्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ची (Love Jihad) प्रकरणे पुष्कळ प्रमाणात समोर येत आहेत. लव्ह जिहाद संदर्भात येत्या अधिवेशनात याबाबत खासगी विधेयक मांडून कायदा करण्याची मागणी भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे (anil bonde) यांनी केली.ते माध्यमांशी बोलत होते.

खासदार अनिल बोंडे म्हणाले, "आंतरधर्मीय विवाह कायद्यात सुधारणा करण्याची गरज आहे. आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांच्या पालकांना आधी सूचना दिली जावी. लव जिहाद थांबवण्यासाठी धर्मीय विवाह कायदा करणे आवश्यक आहे, कारण मुलींना 14 व्या वर्षापासून प्रलोभने दिले जाते, आंतरधर्मीय विवाहाच वय २५ वर्ष करण्यात यावं, सब रजिस्टर मॅरेज ब्युरो मध्येच विवाह झाला पाहिजे व मुस्लिम कायदा लागू होऊ नये यासाठी अधिवेशनात राज्यसभा सभागृहात खाजगी विधेयक मांडू "

Love Jihad News, Uttar Pradesh Latest News
Shiv Sena : सत्तर वर्षांत काय मिळालं, तर आठ चित्ते व गुंगी; शिवसेनेचा केंद्र सरकारला रोखठोक सवाल

राज्यात 'लव्ह जिहाद'ची प्रकरणे झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच ते संसदेच्या आगामी अधिवेशनात या विषयावर विधेयक आणण्याची तयारी करत आहेत. लव्ह जिहाद सुनियोजित कटाखाली सुरू आहे. अमरावतीच्या उमेश कोल्हे खून प्रकरणानंतर पकडलेल्या आरोपीचा लव्ह जिहाद प्रकरणाशीही संबंध असल्याचे समोर आले आहे. हे आता सिद्ध झाले आहे. मेळघाटातील आदिवासी मुलींना अडकवून पळवून लावले जाते. मुलीने विरोध केला तर तिला जीवही गमवावा लागतो, असे बोंडे यांनी यापूर्वीही सांगितले आहे.

अशीच एक घटना काही दिवसापूर्वी चिखलदरा तालुक्यातही उघडकीस आली आहे. काही मुले कॉलेजच्या बाहेर उभी राहून मुलींवर नजर ठेवतात. त्यानंतर फेसबुकच्या माध्यमातून तरुणीशी संपर्क साधला जातो. हे सर्व पूर्ण नियोजन करून चालते. पुढील संसदीय अधिवेशनात विधेयक मांडण्याची तयारी सुरू केल्याचे अनिल बोंडे यांनी सांगितले. आंतरधर्मीय विवाह आणि लव्ह जिहाद रोखण्यासाठी सध्याच्या कायद्यात तरतूद असली तरी ती पुरेशी नाही, असे ते म्हणाले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com