Eknath Shinde : आता हे घ्या ; मिश्रांनी केला 45 नव्हे 48 जागांचा दावा ; शिंदे गटाची अडचण होणार ?

Balasahebanchi Shiv Sena : मिश्रा यांच्या या विधानामुळे शिंदे गटातील नेत्यांसह अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Balasahebanchi Shiv Sena : भाजपच्या मिशन 45 नंतर लवकरच बाळासाहेबांची शिवसेना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक प्लॅन बनवत असतानाच भाजपच्या एका केंद्रीय मंत्र्यानं केलेल्या दाव्यामुळे शिंदे गटाचे पुन्हा टेन्शन वाढले आहे.

भाजपनं मिशन 45 सुरु केलं आणि इतर पक्षाचे दाबे दणाणून गेले. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना सध्या युतीत आहे पण नेमकं हे मिशनं आहे तरी कसं? बाळासाहेबांच्या शिवसेनेचं काय होणार याचीच चर्चा सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला 45 खासदार हवेयत. भाजप शिंदेसोबत सत्तेत आहे. मग शिंदेच्या खासदारांचं काय? अशी राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरु झाली आहे.

या पार्श्वभूमीवर काल (बुधवारी) केंद्रीय मंत्री अजय मिश्रा हे उस्मानाबादच्या दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांनी सांगितले की भाजपचे 45 नव्हे तर मिशन 48 आहे. या मिश्रा यांच्या या विधानामुळे शिंदे गटातील नेत्यांसह अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Eknath Shinde
Ajit Pawar : ‘मास्टरमाईंड’ च्या चिथावणीनेच भाजपाचे आंदोलन ; अजितदादांचा रोख फडणवीसांकडे

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे नुकतेच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन गेले. त्यांनी सभेत 'मिशन 45'बाबत सांगितले. त्यानंतर राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखिल येत्या निवडणुकीत पक्षाने मिशन 45 दिल्याचे सांगतिलं. त्यामुळे शिंदे गटाचे टेन्शन वाढलं होतं.

Eknath Shinde
Chitra Wagh Vs Urfi Javed : चित्रा वाघांची महिला आयोगावर डरकाळी ; म्हणाल्या, 'भाषा नकोय ..'

ते कमी होत ना होत तेच पुन्हा मिश्रा यांच्या दाव्यामुळे शिंदे गटाचे टेन्शन वाढलं आहे. बावनकुळे यांनी शिंदे गटाला सोबत घेऊनच निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केलं होतं. ज्यामुळे शिंदे गटाचं टेन्शन कमी झालं होतं. मिश्रा यांच्या या विधानामुळे शिंदे गटाला लोकसभेत किती जागा मिळतील याबाबत शंका निर्माण झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in