PMC Election : शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी मैदानात...

राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसने (Nationlist Congress) भूमिका घेतली आहे.
Sharad Pawar-Prashant Jagtap
Sharad Pawar-Prashant JagtapSarkarnama

पुणे : राज्यात सत्तापालट झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये (Local Self Government Election) तीन सदस्यांऐवजी चार सदस्यीय प्रभाग करण्याच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. आज किंवा उद्या ही याचिका दाखल होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले.

Sharad Pawar-Prashant Jagtap
नाराज बच्चू कडू 'नंदनवन'वर : CM शिंदेकडून लाल दिव्याचा मुहूर्त घेवूनच बंगला सोडला...

प्रशांत जगताप हे सध्या दिल्लीत आहेत. आज किंवा उद्या राज्य सरकारच्याविरोधात न्यायालयत याचिका दाखल होईल, असे जगताप यांनी सांगितले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना मुंबई वगळता पुण्यासह राज्यातील सर्व महापालिकांमध्ये ३ सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणूक घेण्याचा निर्णय केला होता. मात्र राज्यात भाजपाची सत्ता येताच तीन सदस्यीय प्रभाग रचना रद्द करुन सारी प्रक्रिया सरकारने गेल्या आठवड्यात रद्द केली.

Sharad Pawar-Prashant Jagtap
अजितदादा, भुजबळांचे मंत्रिपद घालवणाऱ्या दमानिया पुन्हा मैदानात : राठोड, सत्तार निशाण्यावर

राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसने भूमिका घेतली आहे. राज्य सरकारचा निर्णय रद्द करण्यासाठी न्यायालयीन लढाई आवश्‍यक असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत आहेत. विधीज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर आज किंवा उद्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष जगताप यांनी सांगितले.

राज्य सरकारचा निर्णय आंमलात आणला तर राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थामंध्ये एक वर्षापेक्षा जास्त काळ प्रशासकराज राहणार आहे. या संदर्भात १९९२ साली करण्यात आलेल्या घटना दुरूस्तीप्रमाणे करण्यात आलेल्या कायद्याचा हा भंग ठरणार आहे, अशी भूमिका जगताप यांनी मांडली. शिवाय सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा चार सदस्यांचा प्रभाग करणे पूर्णत: अयोग्य असल्याची भूमिका जगताप यांनी घेतली आहे.हीच भूमिका घेऊन आपण न्यायालयात दाद मागत असल्याचे शहराध्यक्ष जगताप यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com