कोरोना विरोधातील युद्ध एकत्रित लढ्यातून जिंकू : रामराजे निंबाळकर  

रामराजे निंबाळकर म्हणाले," कोरोनाची दुसरी लाट कधी संपेल व तिसरी कधी येईल सांगता येत नाही. मानवाने नेहमीच संकटावर मात केली आहे. त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये. या परिस्थितीशी सामना करण्यासाठी गोंदवलेकर संस्थानला भविष्यात मोठी जबाबदारी घ्यावी लागेल.
Let's win the war against Corona through joint struggle: Ramraje Naik Nimbalkar
Let's win the war against Corona through joint struggle: Ramraje Naik Nimbalkar

गोंदवले : दुसऱ्या लाटेत कोरोना वाढत आहे. मात्र, राजकारणविरहित एकत्रित लढ्यातून हे युद्ध लवकरच जिंकू, असा विश्वास विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी व्यक्त केला. (Let's win the war against Corona through joint struggle: Ramraje Nimbalkar)

गोंदवले बुद्रुक येथील चैतन्य कोविड रुग्णालय व विलगीकरण केंद्राच्या उदघाटनप्रसंगी सभापती रामराजे बोलत होते. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई,पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार जयकुमार गोरे, बाळासाहेब माने यांची प्रमुख उपस्थिती होती. विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांचीही ऑनलाईन उपस्थिती होती.

चैतन्य कोविड रुग्णालय व विलगिकरण केंद्राचे मान्यवरांच्या हस्ते फित कापून उदघाटन करण्यात आले. श्री ब्रह्मचैतन्य महाराज संस्थानने शासनाला दवाखाना उपलब्ध करून दिला आहे. माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या पुढाकाराने या रुग्णालयात 30 ऑक्‍सिजन बेडच्या सुविधा सुरू करण्यात आल्या. नवचैतन्य हायस्कुलमध्येही शंभर बेडचे विलगीकरण व उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहेत.

श्री.रामराजे निंबाळकर म्हणाले," कोरोनाची दुसरी लाट कधी संपेल व तिसरी कधी येईल सांगता येत नाही. मानवाने नेहमीच संकटावर मात केली आहे. त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये. या परिस्थितीशी सामना करण्यासाठी गोंदवलेकर संस्थानला भविष्यात मोठी जबाबदारी घ्यावी लागेल. ग्रामीण भागात विलगिकरण पाळले जात नसल्याने धोका वाढत असल्याने विलगिकरण केंद्र वाढवावीत.'' 

नीलमताई गोऱ्हे म्हणाल्या," माणमध्ये सुरू करण्यात आलेल्या या सेंटरचा लोकांना चांगला आधार मिळाला आहे. या आपत्ती काळात उपासमार रोखण्यासाठी सरसकट सर्वांना अन्नधान्य मिळावे, म्हणून शासन लवकरच योजना सुरू करत आहे.'' बाळासाहेब पाटील म्हणाले,"सर्वांच्या मदतीतून सुरु करण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटरमधून रुग्णांना चांगल्या सुविधा मिळतील. लोकांच्या संरक्षणासाठी शासनाचे कायम पाठबळ राहिल.

भविष्यातील संकट टाळण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न करू.'' 
प्रभाकर देशमुख, डॉ. आशित बावडेकर यांचीही भाषण झाले. दरम्यान, माण पंचायत समितीच्या वतीने चैतन्य कोविड रुग्णालय व केअर सेंटरसाठी 20 लाख रुपयांचा धनादेश या वेळी देण्यात आला. या सेंटरसाठी योगदान देणाऱ्या संस्थांचा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in