Yashwant Killedar On Aadesh Bandekar : काय व्हायचं ते एकदाच होऊद्या! किल्लेदारांचं बांदेकरांना आव्हान

Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरातील व्यवहार घोटाळा प्रकरणावरून 'ट्विट वॉर'
Adesh Bandekar
Adesh BandekarSarkarnama

Siddhivinayak Temple news : सिद्धिविनायक मंदिराबाबत झालेल्या आरोप खोटे आहेत, त्यात काही तथ्यं नाही, असे म्हणत आदेश बांदेकर (Adesh Bandekar) यांनी त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळले आहेत. तसेच आरोप करणारे मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांचा नक्कलधारी असा उल्लेख केला होते.

त्यावर आता मनसे उपाध्यक्ष यशवंतराव किल्लेदार अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी आता आदेश बांदेकरांना ओपन चॅलेंज दिलं आहे. तसेच त्यांनी ठिकाण सांगून तुमची वेळ द्या, असं खुले आव्हान केलं आहे. दरम्यान सिद्धिविनायक मंदिरातील व्यवहार घोटाळा प्रकरणावरून किल्लेदार आणि बांदेकर यांच्यात 'ट्विट वॉर' सुरू झाले आहे.

Adesh Bandekar
Maharashtra Politics: ''संजय राऊत वैफल्यग्रस्त,त्यांना 'हिंदुत्व'विरोधी विचारांचा मोतीबिंदू झाला आहे..''

याबाबत यशवंत किल्लेदार (Yashwant Killedar) यांनी ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी आदेश बांदेकर यांना खुलं आव्हान केलं आहे. तुम्ही फेटाळालेले आरोप कसे बरोबर आहेत, याचा पुरावा देण्याची देतो, ते तुम्हीच एखदा ऐका, असं म्हणत काय व्हायचं ते एकदाच होऊ द्या, आहे का तुमची तयारी, असं आव्हान दिलं आहे.

Adesh Bandekar
Satyjeet Tambe : '' माध्यमांमध्ये अर्धसत्य पसरवलं जातंय; मी पूर्णसत्य बोलेन तेव्हा, सारे चकित होतील!''

किल्लेदार ट्विटमध्ये म्हणाले, "आदेश बांदेकर नाटकं पुरे झाली आता चला आव्हान देतो स्वीकारा. आपणास एक ऑडीओ क्लीप ऐकवतो, ते पण सिद्धिविनायक बाप्पाच्या गाभाऱ्यामध्ये. आपण कसा अध्यक्ष पदाचा वापर करून मोठ्या देणगीदाराकडून टक्केवारीसाठी कंत्राटे मिळवून देता ते थेट ऐकवतो."

यावेळी किल्लेदार यांनी वेळ आणि ठिकाणाबाबतही उल्लेख केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये सांगितले की, "ठिकाण सिद्धिविनायक (Siddhivinayak) बाप्पा मंदीर गाभारा असले." तर वेळ त्यांनी बांदेकर यांच्यावर सोपवली आहे. ते म्हणाले, "बांदेकर आपण वेळ आणि तारीख द्या. मुद्दा नियमबाह्य कामाबाबत आक्षेपाचा आहे तो ही पुरव्यासकट, त्यावर बोला. असेल हिंमत तर आव्हान स्वीकारा काय ते एकदाच होऊ दे", असं यशवंतराव किल्लेदारांनी म्हटलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये पुढे त्यांनी लिहिलं आहे की, "एक लक्षात ठेवा सिद्धिविनायक मंदीर म्हणजे आदेश बांदेकर नव्हे हे लक्षात ठेवा उगाच तुम्ही केलेल्या पापामध्ये बाप्पाला ओढू नका.अध्यक्ष म्हणजे देवस्थान नव्हे."

Adesh Bandekar
Kasaba By-Election : कसब्याची निवडणूक होणार रंगतदार ; शिवसेनेपाठोपाठ मनसेही रिंगणात..

दरम्यान आदेश बांदेकर (Adesh Bandekar) यांनी त्यांच्यावर झालेलं सर्व आरोप फेटाळले होते. याबाबत ते म्हणाले की, माझ्यावर आणि श्री सिद्धिविनायकांवर तथ्यहिन आरोप होत आहेत. यातून जगप्रसिद्ध हिंदू देवस्थानाची बदनामी करण्याचं षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप केला. असे प्रकार म्हणजे प्रसिद्धिसाठी केविलवाणी धडपड आहेत. हे आरोप करणाऱ्या यशवंत किल्लेदार नामक नक्कलधारी वृत्तीला श्री सिद्धिविनायकांनी सुबुद्धि द्यावी हिच प्रार्थना, असे म्हणत अजूनही मी मर्यादा पाळत असल्याचे बांदेकर म्हणाले होते.

दरम्यान आदेश बांदेकर हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे माझे मित्र आहेत. त्यामुळे मला क्लीनचिट मिळेल, असे वक्तव्य करीत असल्याचा आरोपही किल्लेदार यांनी केला आहे. यावर किल्लेदार म्हणाले की, फडणवीस यांची जनमाणसात प्रतिमा चांगली आहे. त्यांनी मैत्री बाजूला ठेवून काय असेल ते पाहून कारवाई करावी. त्यांची मैत्री या प्रकरणाच्या आड येणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com