विधानपरिषद निवडणूक : खडसे-निंबाळकरांच्या भेटीचं कारण गुलदस्त्यातच

राष्ट्रवादी काँग्रेसची ट्रायडेन्ट हॉटेलला बैठक होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत.
Eknath Khadse, Ramraje Naik Nimbalkar
Eknath Khadse, Ramraje Naik Nimbalkarsarkarnama

मुंबई : राज्यसभेप्रमाणे विधानपरिषद निवडणूकही (legislative council elections) चुरशीची होत आहे. दहा जागांसाठी 11 उमेदवार मैदानात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (legislative council elections latest news)

एकनाथ खडसे हे रामराजे निंबाळकर यांची भेट घेणार आहेत.या भेटी मागचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसची ट्रायडेन्ट हॉटेलला बैठक होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीला राष्ट्रवादीचेअनेक बडे नेते उपस्थित राहणार आहेत.

भाजकडून प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर, उमा खापरे आणि राम शिंदे हे पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी, काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हांडोरे हे रिंगणात आहेत.

विधान परिषदेच्या निवडणुकीत मतांचे गणित जुळविण्यासाठी राजकीय पक्ष आणि उमेदरावांची धावपळ सुरू आहे. कोणत्याच पक्षाकडे अतिरिक्त मते नसल्याने मतांच्या फोडाफोडीवर साऱ्यांनीच भर दिला आहे. सर्व पक्षांचे आमदार मुंबईत मुक्कामी आहेत.

राष्ट्रवादीची मदार अपक्षांवर

अनिल देशमुख व नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार न मिळाल्यास राष्ट्रवादीची मदार ही अपक्षांवर असेल. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना व राष्ट्रवादीकडे अतिरिक्त मते होती. विधान परिषदेत मात्र कोणत्याच राजकीय पक्षांकडे अतिरिक्त मते शिल्लक उरत नाहीत. त्यातच पहिल्या व दुसऱ्या पसंतीची मते आपापल्या उमेदवारांना राजकीय पक्षांना द्यावी लागतील. विजयाकरिता पहिल्या पसंतीच्या २६ मतांची आवश्यकता असेल. त्या दृष्टीनेच सर्व पक्ष २६ मतांचे गणित जुळविण्यावर कामाला लागले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com