आमदारांना धमकावलं, आघाडीनं केलं भाजपचं स्टिंग ऑपरेशन ; रेकॉर्डिंग उघड करणार !

केंद्रीय तपास यंत्रणा काही आमदारांना फोन करीत आहेत, त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे, याचं रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

मुंबई : "विधान परिषद निवडणुकीत (legislative council elections) केंद्रीय तपास यंत्रणाचा (ed) दुरुपयोग सुरू आहे. आमदारांना धमकावल्याची माहिती आम्हाला मिळत आहे. महाविकास आघाडीतील आमदारांना फोन करून धमकावण्याचा प्रयत्न केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू आहे," असा आरोप शनिवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. पटोले माध्यमांशी बोलत होते. (legislative council elections latest news)

"विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची रणनीती तयार आहे. खासदार संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर अपक्ष आमदार त्यांना भेटले, त्यामुळे अपक्ष आमदार नाराज असल्याचा विषय आता संपला आहे, आमच्या उमेदवारांकडे गरजेपेक्षा जास्त मतं आहेत," असे पटोले म्हणाले. "विरोधकांना २२ मतं हवी आहेत, पण एवढी मतं त्यांना मिळणार नाहीत," असे त्यांनी स्पष्ट केलं.

पटोले म्हणाले,"केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग, पैशांचा वापर यांचा उपयोग आता भाजपला होणार नाही. केंद्रीय तपास यंत्रणा काही आमदारांना फोन करीत आहेत, त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे, याचं रेकॉर्डींग आमच्याकडे आहे,"

Nana Patole
स्वतःचा पक्ष सांभाळा, नंतर अपक्ष आमदार बघा ; सोमय्यांनी शिवसेनेला डिवचलं

"ज्या प्रकारे ते फोनवर आमच्या आमदारांना बोलतात, त्यांची भाषा ऐकूण विरोधकांना केंद्राच्या सत्तेची गर्मी आली आहे. आमच्याकडे या साऱ्या प्रकाराचे रेकॉर्डिंग असून, वेळ आल्यावर सर्व पुरावे समोर आणू,"असा इशाराही पटोलेंनी दिला. "आघाडीने केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपचे स्टिंग ऑपरेशन केलं आहे," असे पटोले म्हणाले

Nana Patole
गृहमंत्र्याच्या नावानं पुण्यातील महिलेला दहा लाखांचा गंडा

"आम्हाला मतदान करा, नाहीतर आम्ही तुमच्यावर कारवाई करू, अशा धमक्या आमच्या आमदारांना आलेल्या आहेत. ही परिस्थिती लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे. भाजपने किती त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी महाविकास आघाडीचे सर्व सहा उमेदवार विधान परिषदेवर निवडून येतील," असा विश्वास देखील पटोलें यांनी व्यक्त केला.

नाना पटोले म्हणाले..

  • योग्य वेळी आम्ही जनतेसमोर भूमिका मांडणार आहोत.

  • ईडी आणि सीबीआयचा दुरुपयोग सुरू आहे.

  • विधान परिषद निवडणुकीत आम्ही नक्कीच जिंकू.

  • त्यानंतर जनतेसमोर या सर्व क्लिप आणू.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com