खोत, गर्जेच्या माघारीनंतरही काँग्रेस लढण्यावर ठाम; विधान परिषदेचा आखाडाही रंगणार!

विधान परिषद निवडणूक : महाआघाडी विरोधात भाजप अशी लढत पुन्हा रंगणार
Mahavikas Aghadi
Mahavikas AghadiSarkatrnama

मुंबई : राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीची (Legislative Council election) रणधुमाळी रंगणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. भाजपच्या (BJP) पाठिंब्यावर अपक्ष उभे राहिलेले सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) आाणि पूरक अर्ज भरलेले राष्ट्रवादीचे (ncp) शिवाजीराव गर्जे यांनी माघार घेतली आहे. पण, महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून (Congress) दुसरा उमेदवार मागे घेण्यास नकार देण्यात आल्याने महाआघाडी विरोधात भाजप असा सामना पुन्हा रंगणार आहे. (Legislative Council elections: BJP will fight again against mahavikas Aghadi)

विधान परिषदेचे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यात अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत, तर एकनाथ खडसे यांना पूरक म्हणून भरलेला अर्ज शिवाजीराव गर्जे यांनी माघारी घेतला. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, राम शिंदे आणि उमा खापरे हे भाजपकडून, राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर, एकनाथ खडसे, शिवसेनेकडून सचिन अहिर, आमश्या पाडवी, काँग्रेसकडून भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे हे अकरा उमेदवार रिंगणात असणार आहेत.

Mahavikas Aghadi
महाआघाडीत खडाखडी : राऊतांच्या आरोपाने राष्ट्रवादीचे नेते नाराज; पवारांकडे तक्रार!

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडून सहा, तर भाजपकडून पाच उमेदवार रिंगणात असणार आहेत. शेवटच्या मिनिटांपर्यंत ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न केले गेले. मात्र, काँग्रेस आणि भाजपही आपापल्या म्हणण्यावर ठाम राहिले, त्यामुळे विधान परिषदेची ही निवडणूक लागली आहे. येत्या २० जूनला विधान परिषदेच्या या १० जागांसाठी मतदान होणार आहे. गुप्त मतदान पद्धती हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य असणार आहे. खरी मेख तेथेच असणार आहे. कारण राज्यसभा निवडणुकीत पक्षाच्या आमदारांना आपले मत संबंधित प्रतोदांना दाखवावे लागते. येथे मात्र गुप्त मतदान असल्याने घोडेबाजार रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Mahavikas Aghadi
शरद पवारांची राष्ट्रवादीच्या नेत्यांवर नाराजी; विधान परिषदेला काळजी घेण्याची सूचना!

आम्ही पाचवी जागा जिंकणारच : फडणवीस

सत्तारुढ पक्षांनी ही निवडणूक बिनविरोध करावी, यासाठी आमची अपेक्षा होती. सत्तारुढ पक्षातील काही लोकांनी तसे प्रयत्न केले होते. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. पाचवी जिंकण्याबाबत आम्हाला पूर्ण विश्वास आहे. काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा, यासाठी संबंधितांनी प्रयत्न केला. मात्र, काँग्रेसने उमेदवार मागे घेण्यास नकार दिल्याने ही निवडणूक लागली आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com