चारही पक्षांसाठी दिलासा; सर्वच आमदारांची मते वैध

Legislative Council election : विधान परिषद निवडणूक निकाल
Legislative Council Election
Legislative Council ElectionSarkarnama

मुंबई : भाजपच्या (BJP) दोन मतांवर काँग्रेसने (Congress) घेतलेले आक्षेप फेटाळ्यानंतर २ तासांनी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला वैध आणि अवैध मते मोजली गेली. त्यामध्ये सगळ्या आमदारांची मते वैध ठरली आहेत. त्यामुळे सगळ्याच पक्षांना दिलासा मिळाला आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी (Legislative Council election) महाविकास आघाडीने ६ उमेदवार दिले आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) २ आणि काँग्रेसचे २ शिवसेनेचे (Shivsena) २ उमेदवार आहेत. भाजपने पाच उमेदवार या निवडणुकीत उतरवले आहेत. यामध्ये काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यामध्ये थेट लढत आहे. सर्वच पक्षांनी आपल्या आमदारांना मतदान करण्याविषयी ट्रेनिंग दिले होते. त्यामुळे एकही मत बात झाले नाही.

Legislative Council Election
Bjp : गिरीश महाजन म्हणाले, काॅंग्रेसचा आक्षेप म्हणजे बालिशपणाचे लक्षण

या निवडणुकीत उमेदवारांना विजयी होण्यासाठी २६ मतांचा कोटा पूर्ण करावा लागणार आहे. भाजपकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड निवडणूक रिंगणात आहेत. काँग्रेसकडून चंद्रकांत हांडोरे, भाई जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस कडून रामराजे रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे, शिवसेनेकडून आमशा पाडवी, सचिन अहिर निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Legislative Council Election
विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबाबत हितेंद्र ठाकूरांचे मोठे वक्तव्य!

दरम्यान, सकाळी नऊ वाजता मतदानाला सुरुवात झाली होती. त्यानंतर २८५ आमदारांनी मतदान केले आहे. चिंचवड विधानसभेचे भाजप (BJP) आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) आणि पुण्यातील कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांनी राज्यसभा निवडणुकी प्रमाणेच रुग्णवाहिकेतून येवून आपला मतदानाचा हक्क बजावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com