विधान परिषद : आघाडीच्या नेत्यांची धाकधुक वाढली ; बविआची मते भाजपच्या पारड्यात ?

क्षितिज ठाकूर परदेशी असल्याने बहुजन विकास आघाडीची 3 पैकी 2 मते भाजपला जाणार असल्याचे समजते.
(Legislative Council Election, Bahujan Vikas
(Legislative Council Election, Bahujan Vikassarkarnama

मुंबई : विधान परिषदेच्या (Legislative Council Election) सोमवारी होणाऱ्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजाराची शक्यता आहे. यामुळे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस दगाफटका टाळण्यासाठी आपापल्या आमदारांना ३ दिवस पंचतारांकित हॉटेलात मुक्कामी ठेवणार आहेत. राज्यसभा निवडणुकीनंतर ७ दिवसांतच आमदार पुन्हा हॉटेलात मुक्कामी राहणार आहेत.

बहुजन विकास आघाडीने (Bahujan Vikas) तीन मते वळविण्यासाठी महाविकास आघाडी व भाजप नेत्यांच्या विरारमध्ये फेऱ्या वाढल्या आहेत. आघाडी सरकारचे नेते हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांना भेटून त्यांची मनधरणी करीत असले तरी बहुजन विकास आघाडीचे मते भाजपला पडेल, असे विश्वनीय सुत्रांनी सांगितले. त्यामुळे आघाडी सरकारचे प्रयत्न पुन्हा अयशस्वी ठरणार का, अशी चर्चा रंगली आहे.

(Legislative Council Election, Bahujan Vikas
धक्कादायक : भाजप नेत्याने केली गोळ्या झाडून पत्नीची हत्या, नंतर स्वतःवरही गोळीबार

क्षितिज ठाकूर परदेशी असल्याने बहुजन विकास आघाडीची 3 पैकी 2 मते भाजपला जाणार असल्याचे समजते. त्यामुळे आघाडीच्या नेत्यामध्ये धाकधुक वाढली आहे. छोटे पक्ष आणि अपक्ष मिळून २९ आमदार आहेत. त्यांची मते आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न प्रामुख्याने भाजप आणि काँग्रेस करणार आहेत.

विधान परिषदेच्या निवडणुकीतही अपक्षांची भूमिका ठरणार "अर्थ’पूर्ण ठरणार असल्याचे बोललं जाते. राज्यसभेप्रमाणेच विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये अपक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण असेल.

लाड हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते..

गुरुवारी रात्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी बैठक पार पडली. भाजपचे ५ वे उमेदवार प्रसाद लाड यांना जिंकून आणण्यासाठी १२ मते कमी पडत आहेत. या मतांची बेगमी कशी करायची, यावर या बैठकीत चर्चा झाली. ही अधिकची १२ ते १५ मते राष्ट्रवादीतून मिळू शकतात का? कारण लाड हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते आहेत, यावर चर्चा झाल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com