भाजप विधान परिषदेतही शिवसेनेला दाखवणार आसमान?

राज्यपालांच्या हाती बारा आमदारांची नियुक्ती असल्याने भाजपसाठी संधी निर्माण झाली आहे.
Ramraje Naik Nimbalkar News, Neelam Gorhe Latest News
Ramraje Naik Nimbalkar News, Neelam Gorhe Latest NewsSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेतील 39 बंडखोर आमदार भाजपसोबत (BJP) गेल्याने महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आहे. तर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही त्यांनी 164 संख्याबळ जमवून दाखवत बहुमत सिध्द केलं. त्यानंतर आता विधान परिषदेतही भाजपकडून शिवसेनेला आसमान दाखवले जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Mahavikas Aghadi Latest News)

सध्या विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) तर उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) आहेत. रामराजे यांचं सदस्यत्वाचा कालावधी सात जुलै रोजी संपत आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ते विजयी झाले आहेत. पण सभापतीपदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. तर नीलम गोऱ्हे यांच्यावर सरकारकडून अविश्वासदर्शक ठराव आणला जाऊ शकतो. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि गोऱ्हे यांच्यात सभागृहातच अनेकदा वाद झाले आहेत.

Ramraje Naik Nimbalkar News, Neelam Gorhe Latest News
जावयाचं कौतुक करून जयंतरावांनी सासऱ्यांसाठी लावली फिल्डींग

पण विधान परिषदेतील संख्याबळ पाहता भाजपकडे सध्या पुरेसं संख्याबळ नाही. भाजपचे सध्या वरिष्ठ सभागृहात 24 सदस्य आहेत. तर शिवसेनेचे 11, राष्ट्रवादी व काँग्रेसचे प्रत्येकी 10 सदस्य आहेत. तर एकूण 16 जागा रिक्त असून त्यापैकी 12 जागा या राज्यपाल नियुक्त आहेत. महाविकास आघाडी सरकारकडून 12 जणांची यादी राज्यपालांकडे दिली होती. पण दोन वर्ष उलटूनही या यादीवर मोहोर उमटलेली नाही.

आता भाजप आणि शिंदे गट एकत्र आल्याने त्यांच्याकडून नवी यादी राज्यपालांकडे पाठवली जाऊ शकते. राज्यपालांनी ही यादी अंतिम केल्यास भाजप व शिंदे गट विधान परिषदेतही बहुमताच्या जवळ येईल. त्यानंतर त्यांच्यासाठी अनेक गोष्टी सोप्या होणार आहेत. त्याचा मोठा फटका महाविकास आघाडीला बसेल.

Ramraje Naik Nimbalkar News, Neelam Gorhe Latest News
एकनाथजी, फक्त माझ्या कानात सांगितलं असतं तर..! अजितदादांनी आदित्य ठाकरेंनाही टाकलं पेचात

विधान परिषदेतील पक्षनिहाय संख्याबळ -

भाजप - 24

शिवसेना - 11

राष्ट्रवादी काँग्रेस - 10

काँग्रेस - 10

राष्ट्रीय समाज पक्ष - 1

लोकभारती - 1

पीझंट्स अॅण्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया - 1

अपक्ष - 4

रिक्त - 16

एकूण - 78

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com