Legislative Assembly Session Live| विधानसभेतील शिवसेनेचं कार्यालय सील

Legislative Assembly Session विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून राजन साळवी या निवडणूकीच्या रिंगणात उभे आहेत.
Legislative Assembly Session
Legislative Assembly Session

विधानसभेतील शिवसेनेचं कार्यालय सील करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यालयातील कर्मचारीही अद्याप बाहेरच आहेत.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून राजन साळवी या निवडणूकीच्या रिंगणात उभे आहेत. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपने राहुल नार्वेकरांना संधी दिली आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा अर्धा तास उरला असताना महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत अखेर राजन साळवी यांचे नाव निश्चित करण्यात आले.

राज्यात अनेक नाट्यमय घडामोडींनंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. त्यानंतर नव्या सरकारचं पहिलं अधिवेशन आजपासून दोन दिवस होणार आहे. या अधिवेशनात आज (3 जुलै) विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुक होणार आहे. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गटात व्हिपवरुन जुंपण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com