राष्ट्रवादीची बैठकीला दांडी मारुन जितेंद्र आव्हाड थेट एकनाथ शिंदेच्या भेटीला

Jitendra Awhad| जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी अग्रदूत बंगल्यावर पोहचले.
राष्ट्रवादीची बैठकीला दांडी मारुन जितेंद्र आव्हाड थेट एकनाथ शिंदेच्या भेटीला

मुंबई : शिवसेनेत चाळीस आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. गेल्या महिन्यात विधानपरिषदेच्या निवडणूकीनंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याचे संपूर्ण देशाने पाहिले. आता आमदारांपाठोपाठ खासदारही शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु आहेत. असे असतानाच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादीची बैठकीला दांडी मारुन जितेंद्र आव्हाड थेट एकनाथ शिंदेच्या भेटीला
ठरलं तर! शिवसेना एनडीएच्या उमेदवारालाच मतदान करणार ! राऊतांनी दिले संकेत

जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी अग्रदूत बंगल्यावर पोहचले. मात्र आव्हाड यांनी ही भेट कशासाठी घेतली याचे कारण अद्याप समोर आले नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित बैठकीत राष्ट्रवादीचे सर्व नेते हजर आहे. ही बैठक सुरू असताना जितेंद्र आव्हाड हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी बोलताना सांगितले की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून माझी आणि त्यांची भेट झाली नव्हती. माझ्या मतदार संघात जो बायपास असा आहे, त्याच्या सळया बाहेर आल्याने कधीही अपघात होण्याची शक्यता आहे. ही बाब मी त्यांच्या कानावर घातली आणि त्यावर लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली. विकासकामांसाठी मी त्यांना भेटण्यासाठी गेलो. मी त्यांना भेटीची वेळ मागितली आहे,पण सविस्तर भेटीची वेळ कधी मिळेल याची कल्पना नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in