विधान परिषदेसाठी मुख्यमंत्री अॅक्शन मोडवर ; भाजपला रोखण्याची रणनिती वर्षावर ठरणार!

महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) गुरुवारी वर्षानिवासस्थानी बैठक होणार आहे
विधान परिषदेसाठी मुख्यमंत्री अॅक्शन मोडवर ; भाजपला रोखण्याची रणनिती वर्षावर ठरणार!
CM Uddhav Thackeray sarkarnama

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेत निवडणुकीमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. राज्यसभा निवडणुकीत महाविकसा आघाडीला (Mahavikas Aghadi) फटका बसल्यामुळे आता विधान परिषदेसाठी सावध पावले टाकली जात आहेत. या संदर्भात स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गुरुवारी आघाडीच्या नेत्यांची वर्षा बंगल्यावर बैठक घेणार आहेत. (Legislative Council Election Latest Marathi News)

या बैठकीला आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये विधान परिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार आहे. भाजप (BJP) आणि आघाडीमध्ये सहाव्या जागेवरुन लढत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत. सहाव्या जागेच्या मतांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न या बैठकीमध्ये केला जाणार, असल्याची माहिती आहे.

CM Uddhav Thackeray
विधान परिषद निवडणुकीची समीकरणे सांगलीत जुळणार? : जयंतरावांच्या गाडीत संजयकाका....

या बैठकीसंदर्भात बोलताना काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, विधान परिषद निवडुकीसाठी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. मात्र, आमच्याकडे पुरेसे संख्याबळ आहे. मतांची जुळवाजुळव करण्याची गरज नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याच बरोबर ते म्हणाले, भाजप पैसेवाली पार्टी आहे. आम्ही आमदारांना छोट्याशा हॉटेलमध्ये ठेवू. तसेच त्यांनी यावेळी राहुल गांधी यांची ईडीमार्फत केल्या जाणाऱ्या चौकशीवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर अती झाला आहे. कोणताही दोष नसताना, गुन्हा दाखल झालेला नसताना, गेल्या ३ दिवसांपासून राहुल गांधी यांना त्रास दिला जात आहे.

CM Uddhav Thackeray
राष्ट्रपतीपदासाठी विरोधकांची 'या' दोन नावांवर चर्चा; पवार, बॅनर्जी अ्न खर्गेंवर मोठी जबाबदारी

आडनावावरून जात कळत नाही. या सर्वेक्षणामुळे ओबीसींची संख्या कळणार नाही. यावर मुख्य सचिवांची आज भेट घेतली. राज्य सरकारने ओबीसींवर अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी विनंती केल्याचीही पटोले यांनी सांगितले. सहाव्या जागेसाठी भाजपचे प्रसाद लाड (Prasad Lad) आणि काँग्रेसचे भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्यामध्ये लढत होणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने पाच आणि महाविकास आघाडीने सहा उमेदवार दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in