
मुंबई : सतेच्या हव्यासापोटी महाराष्ट्रातील नेते नैतिकता पार विकून कुरघोडी करण्यात व्यस्त आहे. महाराष्ट्रातील सद्याचे राजकारण खालची पातळी गाठत आहे. याचा आम्ही निषेध करतो, अशी टीका आम आदमी पार्टीच्या (AAP) मुंबई अध्यक्षा व राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या प्रीती शर्मा मेनन (Preeti Sharma Menon) यांनी केली.
सद्या महाराष्ट्रातील राजकरणात हादरे देणारे भूकंप होत आहे. यावर बोलताना मेनन म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याची परिस्थिती अतिशय गंभीर तसेच खेदजनक आहे. जनतेला कोणत्याही लोकप्रतिनिधीवर विश्वास राहू नये अशी वेळ महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी आणली आहे. त्यातच स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी सतत कुरघोड्या करणे व पक्ष फोडीचे राजकारण करणे हे भाजपाला अशोभनीय आहे, अशा शब्दात मेनन यांनी टीका केली आहे.
पुमेनन म्हणाल्या, सत्तापिपासू पक्षाला महाराष्ट्रातील जनतेकडे बघायला वेळ नसून जनसेवेसाठी यांना निवडून दिलंय मात्र सत्तेसाठी आपली विचारधारा बदलायला हे धजावत नाहीत. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशी खोचक टिकाही त्यांनी केली आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना शिवसेनेच्या पक्षनेतृत्वाने ऑफर दिली असून शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी आमदारांची इच्छा असेल तर त्यांनी 24 तासांत मुख्यमंत्री आणि शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहून चर्चा करावी, त्यांच्या मागणीचा विचार होईल. मात्र, त्याआधी तुम्ही मुंबईत येण्याची हिंमत दाखवा," असे आव्हान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. आता पुढे काय राजकीय घडामोडी घडतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.