पडळकरांना संरक्षणाची ग्वाही देतानाच अजितदादांना आठवली ती वाक्ये!

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शाब्दिक चकमक झाली.
पडळकरांना संरक्षणाची ग्वाही देतानाच अजितदादांना आठवली ती वाक्ये!

Gopichand Padalkar, Devendra Fadnavis, Ajit Pawar

sarkarnama

मुंबई : भाजपचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर सांगलीमध्ये हल्ला झाला होता. त्यावर आज (ता.२७) विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरत पडळकर यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला. यावेळी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शाब्दिक चकमक झाली.

विधानसभेत बोलताना फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर विविध आरोप केले. एका लोकप्रतिनीधीवर अशा प्रकारे हल्ला करणे योग्य नाही. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी लावून धरली. महाराष्ट्राचा बंगाल होऊ देऊ नका, या राज्यात राजकीय हत्या होता काम नये, असे फडणवीस म्हणाले. यावर अजित पवार यांनी उत्तर दिले. पवार म्हणाले.

<div class="paragraphs"><p>Gopichand Padalkar, Devendra Fadnavis, Ajit Pawar</p></div>
विधानभवनाच्या पायऱ्यांवरील ती `मिमिक्री` नितेश राणेंना महागात पडणार!

ते म्हणाले, महाराष्ट्राला सुसंस्कृत म्हणून ओळखले जाते. प्रत्येक माणसाला संरक्षण देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे. मात्र, प्रत्येकाने थोडेफार तारतम्य बाळगळे पाहिजे. महाराष्ट्र मला ३० वर्ष ओळखतो. विरोधी पक्षनेते सुद्धा ओळखतात. काही लोक म्हणतात अजित पवारांच्या हातात महाराष्ट्राची सूत्रे दिली तर ते चार दिवसांत राज्य विकून खातील. अरे काय बोलतात? काही पद्धत असते. मी कोणाच्याही अध्यात-मध्यात नसतो. मी फक्त विकासाचे काम करत असतो. कोणत्याही पक्षांचे काम असले तरी करतो. विधानसभेतल्या आणि विधान परिषदेतील सदस्यांनी व्यवस्थित बोलले पाहिजे. आपण जनतेचे प्रतिनिधी आहोत याचे भान ठेवले पाहिजे, असेही पवार म्हणाले. पडळकर यांच्यावरील हल्ल्यांबाबत मी गृहराज्यमंत्री यांच्याशी बोललो आहे. संरक्षण देण्याचे काम आम्ही करू.

या संदर्भातील जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पवार यांनी दिले. दरम्यान, मागील महिन्यात आपल्यावर झालेला हल्ला हा नियोजित कट असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जंयत पाटील यांच्यासह पोलिस अधीक्षक, उपअधिक्षकही सहभागी होते, असा खळबळजनक आरोप पडळकर यांनी केला होता. तसेच त्यांनी बॉडीगार्ड न घेण्याचा निर्णयही घेतला असून पवार व पाटलांविरूध्दचा लढा सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले होते.

<div class="paragraphs"><p>Gopichand Padalkar, Devendra Fadnavis, Ajit Pawar</p></div>
अशोक चव्हाण वैतागून म्हणाले, मेटे तुम्हाला नेमकं काय पाहिजे?

पडळकर यांच्यावर आटपाडी येथे ता. 7 नोव्हेंबर रोजी कथित हल्ला झाला होता. याबाबतचा व्हिडीओ त्यांनी फेसबूकवर पोस्ट केला आहे. सोशल मीडियात हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये पडळकर यांनी थेट जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच व्हिडीओतील दृश्यांच्या आधारे त्यांनी हा हल्ला सुनियोजित असल्याचा दावा केला आहे. त्यावरुन विधानसभेत चांगलीच खडाजंगी झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in