लातूरमध्ये युवासेनेला मोठे खिंडार; आदित्य ठाकरे यांना धक्का

Shivsena | Aditya Thackeray : ठाकरे कुटुंबीयांवर नाराज असलेल्यांची संख्या मोठी
Uddhav and Aditya Thackeray, Maharashtra political crisis News updates
Uddhav and Aditya Thackeray, Maharashtra political crisis News updatesSarkarnama

मुंबई : राज्यात शिवसेनेतील (Shivsena) पडलेल्या उभ्या फुटीनंतर त्याची झळ आता आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) युवासेनेपर्यंत येवून पोहचली आहे. लातूर जिल्ह्यातील युवा सेनेचे पदाधिकाऱ्यांनी आज आदित्य ठाकरे यांना धक्का देत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. ४० पेक्षा जास्त युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज उठाव केला असून यामध्ये जिल्हाप्रमुख, शहर प्रमुख आणि तालुका प्रमुख यांच्याही समावेश होता. या सर्वांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पाठिंबा वाढत असून ४० आमदारांपाठोपाठ अनेक माजी नगरसेवक आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगर, नाशिक अशा महापालिकांमधील नगरसेवकांनी शिंदे यांना पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे ठाकरे कुटुंबीयांवर नाराज असलेल्यांची संख्या मोठी असल्याचे बोलले जात आहे.

नुकतेच मीरा भाईंदर महापालिकेतील शिवसेनेचे १८ विद्यमान नगरसेवक, शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी बंडखोर आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात दाखल झाले आहेत. शिवाय माजी नगरसेविका आणि शिवसेनेच्या प्रवक्या शीतल म्हात्रे (Sheetal mhatre) यांनीही मंगळवारी एकनाथ शिंदे गटाशी हातमिळवणी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाळी केल्यानंतर बंडखोर आमदारांविरोधात शीतल म्हात्रे यांनी आंदोलन केलं होतं, त्यानंतर आठ दिवसातच शीतल म्हात्रे या शिंदे गटात सामील झाल्या आहेत. शिवसेनेच्या मुंबईतील एक आक्रमक नगरसेविका म्हणून त्यांची ओळख आहे. २०१२ आणि २०१७ ला सलग दोन वेळा मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com