मलिकांनी ट्विट केलं अन् क्रांती रेडकर झाली नि:शब्द!
Nawab Malik, Kranti Redkar Sarkarnama

मलिकांनी ट्विट केलं अन् क्रांती रेडकर झाली नि:शब्द!

मलिकांनी केलेल्या ट्विटनंतर वाद निर्माण झाला आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याकडून दररोज सकाळी ट्विट करून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede ) यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले जातात. मात्र, मंगळवारी त्यांनी केलेल्या ट्विटवरून वाद निर्माण झाला आहे. त्यांनी एक व्यक्ती व क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांच्यातील कथित संवादाचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. हा विनोद असल्याचेही ते म्हणाले होते.

मलिकांच्या या कृतीवर क्रांती चांगलीच भडकली आहे. हे खूपच दुर्देवी आहे. आता हे या पातळीवरही येऊन पोहचले आहे, असं म्हणत क्रांतीनं आपण नि:शब्द असल्याची भावना व्यक्त केली आहे. तसेच तिनं मलिकांच्या ट्विटला प्रत्युत्तर दिलं आहे. हा संवाद खोटा असून तयार करण्यात आला आहे. असा कोणत्याही प्रकारचा संवाद कुणासोबतही झाला नसल्याचे क्रांतीने स्पष्ट केलं आहे.

Nawab Malik, Kranti Redkar
काँग्रेसला मोठा धक्का; माजी खासदार किर्ती आझाद ठोकणार पक्षाला रामराम

पुन्हा एकदा कोणतीही खातरजमा न करता पोस्ट करण्यात आली आहे. याविरोधात मुंबई सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार करत आहे, असंही क्रांतीनं सांगितलं आहे. ही आपली संस्कृती किंवा भाषा नसल्याने काळजी करू नका, असं आवाहन तिनं तिच्या पाठीराख्यांना केलं आहे. मलिकांच्या ट्विटचा संदर्भ देत एकाने मलिकांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. हे ट्विटही क्रांतीने रिट्विट केलं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

सकाळी मलिकांनी कॅप्टन जॅक स्पॅरो नावाची एक व्यक्ती आणि वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर यांच्यातील ट्विटवर झालेल्या संवादाचे स्क्रीनशॉट ट्विटरवर टाकले. 'ओह...माय गॉड' म्हणत त्यांनी सुरूवातीला हे काहीतरी गंभीर प्रकरण असल्याचं सूचित केलें. या संवादामध्ये संबंधित व्यक्तीकडून क्रांती रेडकर यांना आपल्याकडे मलिक यांचे दाऊदशी कनेक्शनचे पुरावे असल्याचे सांगितले. त्यावर क्रांतीने कोणते पुरावे आहेत, असा प्रश्न विचारला. त्या व्यक्तीने दोघांचा फोटो असल्याचं उत्तर दिलं. कृपया, पाठव, तुला बक्षिस मिळेल, अशी विनंती क्रांतीनं केल्याचे संवादात दिसते. पहिल्या ट्विटमध्ये एवढाच संवाद टाकत मलिकांनी उत्सुकता वाढवली.

पण तासाभराने मलिकांनी दुसरं ट्विट केलं अन् नेमका खुलासा झाला. या ट्विटमध्ये टाकलेल्या स्क्रीनशॉटमध्ये संबंधित व्यक्तीने क्रांतीला राज बब्बर आणि मलिकांचा फोटो पाठवल्याचे दिसते. त्यावर क्रांती रागाने हा तर राज बब्बर असल्याचे सांगते. होय, पण राज बब्बर यांची पत्नीही त्यांना प्रेमाने दाऊद म्हणून हाक मारते, असं ती व्यक्ती म्हणते. इथे दोघांमधील संवाद संपतो. हा विनोद असल्याचा खुलासा मलिकांनी स्वत:च केला आहे. आपल्याला सकाळी हे मिळाले, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.