कोयनेचे दरवाजे १२ फुटांवर; ५३ हजार क्युसेकचा विसर्ग 

चोवीस तासांत कोयनेत ४८०, नवजा- ५९१, तर महाबळेश्वरला ४७४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील एकूण पाणीसाठा ८५.७३ टीएमसी झाला आहे. जलपातळी ६५४.५५८ मीटर झाली आहे.
कोयनेचे दरवाजे १२ फुटांवर; ५३ हजार क्युसेकचा विसर्ग 
Koyana dams doors on 12 feet; Discharge of 53,000 cusecs-ub73

कोयनानगर : कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून, धरणात २४ तासांत १२.७८ टीएमसीने वाढ झाली आहे. धरणात प्रतिसेकंद सरासरी ८४ हजार ८७८ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणातून दुपारी चार वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे १२ फुटांवर उचलण्यात आले असून, ५१ हजार २६० क्युसेक व कोयना धरण पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक असे प्रतिसेकंद ५३ हजार ३६० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. धरणात ८५.७३ टीएमसी साठा झाला आहे. Koyana dams doors on 12 feet; Discharge of 53,000 cusecs-ub73
 
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. धरणातून पाणी सोडण्यात आल्याने कोयनेसह अन्य छोट्या, मोठ्या नद्यांनी आपल्या धोक्याच्या पातळी ओलांडली आहे. नदीपात्रातील पाणी आजूबाजूच्या गावात, लोकवस्ती, शेतात, बाजारपेठांत व दुकानात घुसल्याने स्थानिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, लोकांना सुरक्षितस्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

कोयना धरणात सध्या मोठ्याप्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर धरणाचे सहा वक्र दरवाजे बारा फुटांनी वर उचलण्यात आले आहेत. तूर्तास यापेक्षा जास्त पाणी सोडण्याचा विचार नाही. तथापि अचानकपणे धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण अधिकच वाढले, तरच यापेक्षा अधिक पाणी सोडण्यात येईल, असे कोयना धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता नितीश पोतदार यांनी सांगितले. 

गुरुवारी संध्याकाळी पाच ते शुक्रवारी संध्याकाळी पाच या २४ तासांत धरणातील पाणीसाठ्यात १२.७८ टीएमसीने वाढ झाली आहे. चोवीस तासांत कोयनेत ४८०, नवजा- ५९१, तर महाबळेश्वरला ४७४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील एकूण पाणीसाठा ८५.७३ टीएमसी झाला आहे. जलपातळी ६५४.५५८ मीटर झाली आहे. 


 

Related Stories

No stories found.