जातीयवादी राजकारणाला कोल्हापूरकरांचा मुहतोड जवाब... महेश तपासे

कोल्हापूर kolhapur पोटनिवडणुकीतील Byelection हा विजय काँग्रेसचा Congress, शिवसेनेचा Shivsena, राष्ट्रवादीचा NCP आहे.
जातीयवादी राजकारणाला कोल्हापूरकरांचा मुहतोड जवाब... महेश तपासे
Mahesh Tapasesarkarnama

मुंबई : राज्यात व देशात भाजपने जातीयवादी आणि धर्मवादी राजकारण परत सुरू केले आहे, त्याला मुहतोड जवाब कोल्हापुरकरांनी दिला आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी कोल्हापूरच्या विजयावर प्रतिक्रिया दिली आहे.

उत्तर कोल्हापूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी सरकारच्या उमेदवार श्रीमती जयश्रीताई जाधव यांचा विक्रमी विजय झाला असून याबद्दल कोल्हापूरकरांचे मनापासून अभिनंदन करतानाच महेश तपासे यांनी आभार मानले आहेत.

Mahesh Tapase
चंद्रकांतदादांची कोंडी! हिमालयात जाण्याची वल्गना आली अंगलट

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मतदारांना पेटीएमच्या माध्यमातून पैसे दिले जातात. त्यांची देखील ईडीच्या माध्यमातून चौकशी होईल, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर कोल्हापूरच्या जनतेने चंद्रकांत पाटील व भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे, असेही महेश तपासे म्हणाले.

Mahesh Tapase
बलाढ्य भाजपला आस्मान दाखविलेल्या जयश्री जाधव नेमक्या आहेत तरी कोण?

कोल्हापूर पोटनिवडणूकीतील हा विजय काँग्रेसचा, शिवसेनेचा, राष्ट्रवादीचा आहे. महाविकास आघाडी सरकारने जनतेसाठी घेतलेल्या निर्णयांचा आणि धोरणांचा विजय आहे, असे स्पष्ट करतानाच कोल्हापूरकरांचे महेश तपासे यांनी आभार मानले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.