भाजपला झटका; नऊ नगरसेवकांच्या अपात्रतेची याचिका फेटाळली

पक्षाचा व्हिप डावलून शिवसेनेच्या उमेदवाराला या नगरसेवकांनी मतदान केलं होतं.
BJP
BJP Sarkarnama

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेत भाजपला (BJP) पुन्हा एकदा धक्का बसला आहे. आधी शिवसेना (Shivsena) आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) झटका दिल्यानंतर आता विभागीय आयुक्तांनीही भाजपच्या विरोधात निकाल दिला आहे. महापौर पदाच्या निवडणुकीत पक्षाचा व्हिप डावलेल्या नऊ नगरसेवकांना अपात्र ठरवण्याची याचिका विभागीय आयुक्तांनी फेटाळून लावली आहे.

कोकण विभागीय आयुक्तांनी गुरूवारी भाजपची याचिका रद्द केल्याने नऊ नगरसेवकांचा जीव भांड्यात पडला आहे. या निर्णयामुळे कलानी गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. भाजपचे गटनेत जमनुदास पुरस्वानी यांनी पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र ठरविण्याची याचिका दाखल केली होती.

BJP
ओमिक्रॉनचा रुग्ण पाच दिवसांपूर्वीच पळाला दुबईला; नेमकं काय झालं वाचा...

उल्हासनगर महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहूमत असताना निवडणुकीवेळी भाजपमधील कलानी गटाच्या नगरसेविका पंचम कलानी यांच्यासह डिंपल ठाकूर, दीपा पंजाबी, शुभांगिनी निकम, छाया चक्रवर्ती, रेखा ठाकूर, आशा विराडे, कविता गायकवाड व जयश्री पाटील यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केलं होतं. पक्षाचा व्हिप डावलून भाजपच्या उमेदवाराविरोधात मतदान केल्याने त्यांना अपात्र ठरवण्याची मागणी करण्यात आली होती. या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार निवडून आला होता.

BJP
अगर जीत का सेहरा बंधवाना हो तो, पराजय का बोझ भी स्वीकारना होगा!

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ओमी कलानी (omi kalani) गटाच्या २२ नगरसेवकांनी ठाण्यात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. गेल्या निवडणुकीत हे २२ नगरसेवक भाजपाच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत. पप्पू कलानी यांची सून पंचम कलानी यांनी भाजपा नगरसेवक पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. उल्हासनगरच्या राजकारणात कलानी या नावाला मोठं वलय आहे.

आधी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पप्पू कलानी यांनी नंतर राजकारणात प्रवेश केला आणि १९९० पासून सलग ४ वेळा आमदार म्हणून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. यापैकी काँग्रेस, आरपीआय, तर दोन वेळा अपक्ष उमेदवार म्हणून ते निवडून आले. उल्हासनगर महापालिकेत भाजपाचे एकूण ४० नगरसेवक असून त्यापैकी ओमी कलानी गटाचे २२ नगरसेवक आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com