शिवतीर्थावरच उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा होणार; पेडणेकरांनी ठणकावले

दसरा मेळाव्यावरुन शिंदे गट आणि शिवसेना (Shivsena) पुन्हा आमने-सामने
Kishori Pednekar
Kishori Pednekar Sarkarnama

Kishori Pednekar : मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेनेतील (Shivsena) संघर्ष टोला गेला आहे. शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड करुन ठाकरे सरकार पाडले. त्यानंतर शिवसेनेवर दावा सांगितला. त्याचा वाद निवडणूक आयोगापर्यंत गेला आहे. त्यातच आता शिवसेनेची अनेक वर्षांची परंपरा असलेल्या शिवाजी पार्क मैदानावरील दसरा मेळाव्यावरुन राजकारण तापले आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दसरा मेळावा होणारच असल्याचे सांगितले आहे.

दसरा मेळाव्यावरून सुरू झालेल्या वादावर पेडणेकर म्हणाल्या, 'दसरा मेळाव्याबाबत महापालिकेला आपणी भूमिका स्पष्ट करावीच लागेल. शिवसेना कुणाची हे न्यायालयात ठरेल, त्याच्याशी महापालिकेचा काहीही संबंध नाही. त्यामुळे उगाच दबावाखाली येऊ नये'. तसेच त्यांनी रडीचा डाव खेळण्याचा प्रयत्न करु नये. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला ५६ वर्षांची परंपरा आहे. शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा होणारच'. आयुक्त व वॉर्ड ऑफिसर यांनी लवकरच योग्य निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

Kishori Pednekar
Mahabaleshwar : बेकायदेशीर बांधकाम असलेल्या हॉटेलमध्ये मुख्यमंत्र्यांचा मुक्काम... सचिन मोहिते

दरम्यान, शिवसेनेची अनेक वर्षांची परंपरा खंडीत करुन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर दसरा मेळाव्यावरुनही कुरघोडी करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून सुरु आहे. शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरे हे दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत. मात्र, दसरा मेळाव्यासाठी ठाकरे यांना अजूनही परवानगी मिळालेली नाही. त्यातच शिंदे गटाकडून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेऊन आम्हीच खरी शिवसेना असल्याचे दाखून देण्याची शक्याता व्यक्त केली जात आहे.

Kishori Pednekar
चंद्रकांत पाटलांचा कोल्हापुरात काँग्रेसला धक्का; ज्येष्ठ नेत्याला लावले गळाला!

एकनाथ शिंदे गटाच्या बंडाळीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. पावसाळी अधिवेशनात शिंदे गटाच्या आमदारांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. शिवसेनेने दसरा मेळाव्याबाबत मुंबई महापालिकेला शिवाजी पार्कच्या मैदानासाठी अर्ज केला आहे. शिवसेनेने अर्ज केल्यानंतर महापालिकेने अद्याप परवानगी दिली दिलेली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in