Kishori Pednekar
Kishori Pednekar

Kishori Pednekar यांनी धुडकावले सोमय्यांचे आरोप; चौकशीला जाण्यासही नकार...

SRA Case| किशोरी पेडणेकर यांचा संबंध नाही, असे एसआरएकडूनही कळवण्यात आलं आहे.

SRA Case मुंबई : शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलेले आरोप साफ धुडकावून लावले आहेत. इतकेच नव्हे तर आज चौकशीलाही हजर राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आपल्यावर दबावतंत्राचा वापर करण्यात येत असून मला काहीही करुन अडकवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

कथित एसआरए घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी कालही चौकशी झाली होती. त्यानंतर आजही त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलणवण्यात आलं होतं. वरळीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज दादरमध्येही या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kishori Pednekar
वातावरण तापलं! कैलास पाटलांच्या आंदोलनाला हिंसक वळण...

दरम्यान, ज्या एसआरए घोटाळ्यांवरुन त्यांच्यावर आरोप केले आहेत आज त्या तिथेच दाखल झाल्या होत्या. यावेळी पेडणेकर यांनी स्वत: माध्यमांसमोर गाळेधारकांसोबत बातचीत केली. दरवेळी प्रत्येक गोष्टीला आरोपीच्या पिंजऱ्या उभं केलं जातं, असा आरोपही त्यांनी यावेळी केली. किशोरी पेडणेकर यांचा संबंध नाही असे एसआरएकडूनही कळवण्यात आलं आहे. माझा आवाज दाबण्यासाठी दबावतंत्राचा वापर सुरु आहे. माझ्यावर वार करून जेरीस आणण्याचा प्रयत्न केला जातोय. आतापर्यंत ज्यांना जेरीस आणले ते भाजपच्या वॉशिंग मशिन मध्ये गेले, असा आरोपही त्यांनी केला आहे.

Kishori Pednekar
इंदापुरातून विजयाचा ढोल कोणाचा वाजणार...हर्षवर्धन पाटील, दत्तात्रेय भरणे की प्रवीण माने?

गोमाता नगरमध्ये मी 2017 मध्ये अर्ज भरला होता. पण आता कारण नसताना आता याप्रकरणी पुन्हा राळ उठवली जात आहे. गोमातामधील काही दुकाने आणि बालवाड्या सोसायटीच्या ताब्यात आहेत. पण इथल्या एकाही गाळेधारकाने हे गाळे किशोरी पेडणेकरांचे असल्याचे सांगितले तर त्याला कुलूप लावा, असं आव्हानही पेडणेकर यांनी केलं आहे.

असे बिनबुडाचे आरोप करुन किरीट सोमय्या माझ्यासारख्या एका सामान्य महिलेला त्रास देत आहेत, असा आरोपही पेडणेकर यांनी सोमय्यांवर केला. पण न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे, असा विश्वासही किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला आहे. एसआरए सदनिका घोटाळा प्रकरणाच्या आरोरपींशी पेडणेकर यांचे व्हॉट्स अॅप चॅट झाल्याचे माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. या व्हॉट्स अॅप चॅटमुळे आता किशोरी पेडणेकर अडचणीत आलेत. सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर दादर पोलिसांनी पेडणेकरांची चौकशी करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in