Kishori Pednekar : तुमच्या घरातल्या स्त्रियांना नटी म्हणता का? ; पेडणेकर गुलाबरावांवर संतापल्या!

Kishori Pednekar : कुठल्या अँगलने अंधारे नटी वाटतात ते कळत नाही,
kishori Pednekar & Gulabrao Patil
kishori Pednekar & Gulabrao PatilSarkarnama

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या व मुंबईचे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबाबत केलेल्या विधानाबाबत आणि मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. आज ते मुंबई येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

kishori Pednekar & Gulabrao Patil
पातळी घसरुन टीका होत असेल तर ते अयोग्यच; पंकजा मुंडे

पेडणेकर म्हणाल्या, स्रियांचा आदर केलाच पाहिजे. कुठल्याही पक्षाच्या स्त्रिया असू देत, सन्मान केला गेला पाहिजे. मात्र आज आपण पाहतोय की, स्त्रियांचा अनादर होत आहे. स्त्रियांचा आदर करा असं आपण बोलतो, पण तो होत नाही. गुलाबराव पाटील मंत्री महोदय आहेत, त्यांनी सुषमा अंधारे यांना नटी म्हंटले आहे. कुठल्या अँगलने अंधारे नटी वाटतात ते कळत नाही, पण तुमच्या घरातल्या स्त्रियांना देखील तुम्ही नटी म्हणता का? असा सवाल पेडणेकरांनी केला.

kishori Pednekar & Gulabrao Patil
Poonam Mahajan : माझ्या वडिलांना मारणाऱ्या मास्टरमाईंडचा शोध काँग्रेस-राष्ट्रवादीने का घेतला नाही ?

एका स्त्री ला तुम्ही नटी म्हणता, मात्र तुमच्या कडे असलेल्या सी ग्रेड नटीवर बोलताना तुमची दातखीळी बसते का? असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका केली. माझं म्हणणं आहे कोणालाच, असं बोलू नका. सुप्रिया सुळे या सन्माननीय नेत्या आहेत. त्यांचा आदर करावा, असेही पेडणेकर म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in