शेलारांना पेडणेकरांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाल्या...

शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) जोरदार शाब्दिक वाद रंगला आहे
Kishori Pednekar, ashish shelar
Kishori Pednekar, ashish shelarsarkarnama

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या आधीच राजकारण तापले आहे. मुंबईमध्ये शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) शाब्दीक युद्ध रंगले आहे. 'तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला पेंग्विन सेना म्हणायचे का? असा तिखट सवाल करत भाजपचे मुंबईशहर अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेला डिवचले होते. त्यावरून शेलारांना माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori pednekar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

शिंदे गटाच्या बंडाळीनंतर मुंबईसह राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे. शेलार यांच्या टीकेनंतर पेडणेकर यांनी भाजपवर हल्लाबोल केला. पेडणेकर म्हणाल्या, 'पेंग्विन सेना हे ते म्हणतात. कमळाबाई हे केवळ आम्हीच नाही, त्यांचेही नेतेही बोलतात. प्रत्येक वेळी प्राणी, पक्ष्यांना मध्ये ओढू नाका. प्राणी, पक्षी जसे कुटुंबवस्तल असतात तसेच आमचे उद्धव ठाकरे हे कुटुंबप्रमुख आहेत, अशा शब्दात पेडणेकर यांनी शेलार यांना सुनावले.

Kishori Pednekar, ashish shelar
बुलडाणा हा बिहार नाही; हल्ल्याचा उद्रेक संपूर्ण जिल्ह्यात होईल : शिवसेनेचा इशारा

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील दसरा मेळाव्यावरून मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला आहे. त्यावर भाष्य करताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, 'शरद पवारांचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील घेतात. जर आज पवार काही सल्ला देताहेत, तर तो महत्वाचा आहे. आम्हालाही कार्यकर्त्यांना हे सांगायचे आहे की इतिहास पुसण्याचे आणि संपवण्याचे काम करू नका. अपवाद वगळले तर एक मैदान, एक झेंडा, एक वक्ता हा आजवरचा विक्रम शिवसेनेचा आहे.

'दसरा मेळावा त्याच मैदानावर होणार, असल्याचेही पेडणेकर यांनी सांगितले. सगळे आता गजनी बनू बघत आहेत. प्रशासन हे गजनी होणार नाही अशी अपेक्षा आहे. शरद पवारांचा सल्ला ऐकावा, अर्थात सध्या भलतेच सल्ले ऐकले जात आहेत. 'प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा' हा नियम आहे. ज्यांचा पहिला अर्ज येतो, तो मंजूर होतो हा नियम आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Kishori Pednekar, ashish shelar
बिहार लवकरच जेडीयूमुक्त, RJD-नितीश आघाडी तोडणार : भाजप नेत्याचा दावा

शिवसेनेने मुखपत्र सामनातून भाजपवर टीका करण्यात आली होती. त्यावरून शेलारांनी शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. शेलार म्हणाले, होते 'आपण आमच्या कमळाला हिणवायला 'बाई' म्हणताय? हरकत नाही, बाईमध्ये आई, ताई आणि लक्ष्मीपण आहे. त्यामुळे तुमच्या उरल्या सुरल्या पक्षाला, आम्ही आता 'पेंग्विन सेना' म्हणायचे का? असे कडक अस्सल मुंबईकर शब्द आमच्याकडे पण आहेत', असा इशारा दिला होता. त्यावरुन पेडणेकर यांनी शेलार यांच्यावर टीका केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com