उद्धव ठाकरे कारवर उभे राहून भाषण करणार? पेडणेकरांच्या ट्वीटमुळे चर्चांना उधाण

शिवसेनेला (shivsena) शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास मुंबई महानगरपालिकेने परवानगी नाकारली आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama

मुंबई : शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास मुंबई महानगरपालिकेने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे भाषण नेमके कुठे होणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Uddhav Thackeray
वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणी आता थेट आदित्य ठाकरे रस्त्यावर उतरणार

त्यातच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी एक फोटो ट्वीट केला आहे. त्या फोटोद्वारे दसरा मेळाव्याबाबत सूचक संकेत दिले आहेत. पेडणेकर यांनी केलेल्या ट्वीटमुळे उद्धव ठाकरे आपल्या गाडीवर उभे राहून दसरा मेळाव्याचे भाषण करणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

पेडणेकर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरे हे एका गाडीच्या बोनेटवर उभे राहून भाषण करताना दिसत आहेत. त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांची गर्दी जमल्याचे दिसत आहे. ''आतुरता दसरा मेळाव्याची... पुनरावृत्ती होणार... #जात_गोत्र_धर्म #शिवसेना" असे कॅप्शन पेडणेकर यांनी दिले आहे.

Uddhav Thackeray
डोळे काढेन.. म्हणता एवढी हिंमत आहे का तुमच्यात?; पेडणेकरांचं राणेंना आव्हान

माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी काही दिवसांपूर्वी बाळासाहेबांच्या एका जुन्या भाषणाची आठवण सांगितली होती. त्यात त्यांनी गाडीच्या बोनेटवर उभे राहून भाषण केल्याचे सांगितले होते. आता पेडणेकरांनी हा फोटो ट्वीट करत 'पुनरावृत्ती'चे संकेत दिले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे कारवर उभे राहून भाषण करणार का, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरु झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in