संजय राऊतांना किरीट सोमय्यांची 48 तासांची मुदत! अन्यथा...

डॉ. मेधा सोमय्या यांनी १०० कोटींचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता.
संजय राऊतांना किरीट सोमय्यांची 48 तासांची मुदत! अन्यथा...
Sanjay Raut, Kirit SomaiyaSarkarnama

मुंबई : शिवसेनेचे (shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप (Bjp) नेते माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर विविध आरोप केले होते. तसेच सोमय्या यांच्या पत्नी डॉ. मेधा सोमय्या यांनी १०० कोटींचा शौचालय घोटाळा केला असल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. त्यावरुन आता मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांना नोटीस बजावली आहे. ४८ तासांत माफी मागा अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.

संजय राऊत यांनी सोमय्या कुटुंबावर अनेक आरोप केले आहेत. त्याचे पुरावे त्यांनी द्यावे, अन्यथा माफी मागणी, असे मेधा सोमय्या यांनी पाठवलेल्या नोटीसीमध्ये म्हटले आहे. त्याच बरोबर राऊत यांनी केलेला 100 कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप बदनामीकारक असून ते पूर्णपणे खोटे आहेत, असा दावा केला आहे.

Sanjay Raut, Kirit Somaiya
राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात, दोन मराठी कलाकारांच्या गाडीचे नुकसान

त्याचबरोबर सोमय्या यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, खार येथील सीसीटीव्ही फुटेज संजय पांडे यांनी गायब करण्याचा निरोप दिला आहे. आठवडाभरापासून आम्ही सीसीटीवी फुटेज मागत आहोत. मात्र, ते दिले जात नाही. तुम्ही ते फुटेज गायब करण्याचा निर्णय घेतला. सीसीटीव्ही फुटेज द्या, अशी मागणी त्यांनी केली.

सीबीआयने आज विविध ठिकाणी छापेमारी केली. त्यावर सोमय्या म्हणाले, त्यांनी बॅंकांचा पैसा लुटला मग, ते DHFL, पीएमसी, HDIL, किंवा Yes बँक असेल. ते पैसा तिथून जर उद्योगपती आणि बिल्डरला आपारदर्शक पद्धतीने गेले असेल तर सगळ्या लाभार्थींची चौकशी होणारच.

Sanjay Raut, Kirit Somaiya
उद्धव ठाकरेंच्या 'तुटून पडा' आदेशाला भाजपचे 'सडेतोड' उत्तर; केशव उपाध्येंची जहरी टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत बोलबच्चन आहेत. तुम्हाला शोभत नाही तुम्ही हिंदुत्वाच्या बाता करता, असा टोलाही सोमय्या यांनी लगावाल. आता कुठल्या अजान स्पर्धा आता तर सर्वच हिरव झाल आहे. तुम्ही तुमच्या परिवाराच्या संस्कृतीची पुरेशी इज्जत काढली आहे, असेही सोमय्या म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.