Kirit Somaiya|महाविकास आघाडीचा आणखी एक नेता अडचणीत; सोमय्यांचे गंभीर आरोप

Kirit Somaiya| महाविकास सरकारचे पर्यावरण मंत्री आणि मुंबईचे पालक मंत्री यांना त्यावेळेला तक्रारी आल्या होत्या,
Kirit Somaiya criticise Uddhav Thackeray, Kirit Somaiya News, Political News Marathi
Kirit Somaiya criticise Uddhav Thackeray, Kirit Somaiya News, Political News Marathisarkarnama

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आज त्यांनी मढ येथील माजी मंत्री अस्लम शेख यांच्या स्टुडिओ प्रकरणी एक हजार कोटींचा आरोप केला. मढ मार्वे येथील सीआरझेड जमिनीवरील अनधिकृत स्टुडिओच्या बांधकामाला तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी परवानगी दिली होती. ज्यात 1000 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

या प्रकरणी किरीट सोमय्या, अतुल भातखळकर यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांनी पाहणी केली. स्टुडिओ बांधताना पर्यावरण कायद्यांचे उल्लंघन करण्यात आल्याचे कारण देत स्टुडिओ पाडण्याची मागणी केली. स्टुडिओचं 28 व्यावसायिक आणि 10 लाख स्क्वेअर फुटचं बांधकाम करण्यात आलं आहे. आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना या बांधकांमासाठी अधिकृत परवानगी दिली होती. तुम्ही आरे वाचवण्यासाठी तुम्ही एवढं केलं, इथे तुम्हाला पर्यावरणाचंं नुकसान दिसलं नाही का? कोव्हिड काळात बांधकाम केलं हे तुम्हाला दिसलं नाही का? असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला आहे.

Kirit Somaiya criticise Uddhav Thackeray, Kirit Somaiya News, Political News Marathi
मराठी नाट्य चळवळ नक्कीच मोठी होईल, मुनगंटीवारांनी प्रशांत दामलेंना केले आश्‍वस्थ...

या बेकायदेशीर स्टुडियो प्रकरणाची शिंदे-फडणवीस सरकारनं चौकशी सुरु केली आहे. तिकडे अनिल परबचा आणि इकडे अस्लम शेख आणि आदित्य ठाकरेंच्या आशीर्वादाचे स्टुडिओ तुटणार, असल्याचा दावही सोमय्या यांनी केला आहे. 22 फेब्रुवारी 2021 रोजी आदित्य ठाकरेंच्या पर्यावरण मंत्रालयाने या स्टुडिओच्या बांधकामाला परवानगी दिली. पण ही परवानगी 6 महिन्यासाठी होती आणि आज 19 महिने झाले आहेत. हे स्टुडिओ समुद्रात बांधले आहेत, त्यामुळं ते तुटणारच", असा दावाही किरीट सोमय्या यांनी केला आहे.

23 ऑगस्ट 2022 ला सोमय्या यांनी एक ट्विट केलं होतं. '' मुंबईच्या मढ मार्वे येथील सीआरझेड जमिनीवरील एक हजार कोटींचा अनधिकृत स्टुडिओचा बांधकामाला महविकास आघाडी नी 22/2/2021 रोजी मान्यता दिली होती. महाविकास सरकारचे पर्यावरण मंत्री आणि मुंबईचे पालक मंत्री यांना त्यावेळेला तक्रारी आल्या होत्या, त्यांनी ह्या भागाची पाहणी ही केली होती.",असं ट्विट त्यांनी केलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com