अजित पवारांचा पाच हजार कोटींचा घोटाळा बाहेर काढणार : सोमय्या यांचा पुन्हा इशारा

अजित पवारांना (Ajit Pawar) प्रश्न विचारत राहणार असल्याचा सोमय्या यांचा दावा
अजित पवारांचा पाच हजार कोटींचा घोटाळा बाहेर काढणार : सोमय्या यांचा पुन्हा इशारा
Kirit Somaiya and Ajit Pawarsarkarnama

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी संबंधित कंपन्या, साखर कारखाने आणि निकटवर्तीयांवर प्राप्तिकर विभागाचे छापे पडलेले असतानाच भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी रविवारी नवा इशारा दिला. अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. अजित पवार यांचा घोटाळा ५ हजार कोटींपेक्षा मोठा असल्याचा दावा त्यांनी केला.

Kirit Somaiya and Ajit Pawar
'पाहुणे' परतले, अजितदादांशी संबधीत 'आयान'ची तब्बल ७० तास तपासणी

सोमय्या म्हणाले, की जरंडेश्वर कारखान्याचा मालक कोण आहे, असा माझा अजित पवार यांना प्रश्न आहे. माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत मी पवारांना प्रश्न विचारत राहणार. त्यांच्यात या प्रश्नांची उत्तरे देण्याची हिंमत असेल, अशी आशा करतो. बुधवारी मी पुण्यात अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची आणखी एक पोलखोल करणार आहे. यांनी इतके गैरव्यवहार केले आहेत, इतकी लूट केली आहे की मोजदाद करणे अवघड आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Kirit Somaiya and Ajit Pawar
‘सरकारी पाहुणे’ शोध मोहिमेत व्यस्त अन्‌ अजितदादांच्या कारखान्याचा गाळप हंगाम दणक्यात सुरू

ते पुढे म्हणाले, की अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर चार दिवसांपासून छापे सुरू आहेत. हा पाच हजार कोटींपेक्षा मोठा गैरव्यवहार आहे. त्यांना तुरुंगात जावेच लागेल. आपल्यावर कारवाई होईल, असे महाविकास आघाडला स्वप्नातही वाटले नसेल. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते करून दाखविले, असा दावाही सोमय्या यांनी केला.

अजित पवार, हसन मुश्रीफ,किशोरी पेडणेकर आणि नवाब मलिक यांच्यावर मी भ्रष्टाचाराचे आरोप केले. पण मी दिलेले पुरावे खोटे आहेत, हे सांगण्याची एकाचीही हिंमत झाली नाही, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.