Rashmi Thackeray : ठाकरेंच्या अडचणीत वाढ ; सोमय्यांनी नवीन वर्षांनिमित्त दिले हे 'गिफ्ट'

Kirit Somaiya : सोमय्यांनी जाहीर केलेल्या यादीत महाविकास आघाडीतील नेत्यांची नावे आहेत.
Rashmi Thackeray
Rashmi Thackeraysarkarnama

Kirit Somaiya : भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शनिवारी टि्वट करीत आपले नववर्षांचे संकल्प जाहीर केले होते. त्यानुसार या वर्षी (२०२३) मध्ये त्यांच्या टार्गेटवर कोण असणार यांची यादी त्यांनी समाजमाध्यमांवर शेअर केली होती. सोमय्यांनी जाहीर केलेल्या यादीत महाविकास आघाडीतील नेत्यांची नावे आहेत.

नववर्षांच्या पहिल्या दिवशी सोमय्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याविरोधात रेवदंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे रश्मी ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Rashmi Thackeray
Koregaon Bhima : धमकीनंतर चंद्रकांतदादांनी घरुनच केलं विजयस्तंभाला अभिवादन ! ; म्हणाले, 'छातीवर गोळ्याही..'

शनिवारच्या टि्वटमध्ये सोमय्या यांनी नवीन वर्षात महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षातील ५ नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचे सांगितले आहे. यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबिय, तसेच दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणातील अनिल परब, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर, काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांचा समावेश आहे. यात ठाकरे कुटुंबाचे १९ बंगले.अनिल परब यांचे दापोलीतील साई रिसॉर्ट, ४९ स्टुडीओप्रकरणी अस्लम शेख, मुश्रीफ आणि किशोरी पेडणेकर यांचा पालिका घोटाळा आणि SRA घोटाळ्यातील पाळमूळ खोदून काढण्याचा दावा सोमय्यांनी केला आहे.

Rashmi Thackeray
Koregaon Bhima : विजयस्तंभाकडे शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांनी फिरवली पाठ ; सुषमा अंधारे संतापल्या..

1 जानेवारीला आपण रेवदंडा पोलिस स्टेशनमध्ये ठाकरे आणि वायकर यांचा कोर्लई अलिबागच्या '19 बंगल्यांच्या घोटाळा' प्रकरणी तक्रार करण्यासाठी जाणार असल्याचे यापूर्वीच किरीट सोमय्या यांनी जाहीर केले होते.

ठाकरे आणि वायकर परिवारावर ग्रामपंचायत रेकॉर्डच्या तरतुदीनुसार ग्रामपंचायतीची नोंद खोटी करणे आणि ग्रामपंचायतीमध्ये बेकायदेशीर कृत्य करणे. त्यानुसार त्यांच्यावर वरीलप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी डॉ. किरीट सोमैया यांनी पोलिसांना केली आहे. "रश्मी ठाकरे यांच्या या व्यवहाराची चौकशी व्हायला हवी. ज्याप्रमाणे अनिल परब यांच्या रिसॉर्टची चौकशी झाली आणि कारवाई करण्यात आली. तशीच कारवाई रश्मी ठाकरे यांच्या विरोधात करण्यात यावी अशी मागणी यांनी त्यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com