हवाला किंग चतुर्वेदी आणि मुख्यमंत्री ठाकरेंचे संबंध काय? सोमय्यांचा हल्लाबोल

सोमय्या यांनी आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री ठाकरे व त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत.
Uddhav Thackeray, Kirit Somayya on Uddhav Thackeray and Havala king nandkishor chaturvedi Relation
Uddhav Thackeray, Kirit Somayya on Uddhav Thackeray and Havala king nandkishor chaturvedi Relationsarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar)यांच्यावर मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजे ईडीने (ED)कारवाई केली आहे. ईडीने पाटणकर यांचे ठाण्यातील कोट्यवधी रुपयांचे फ्लॅट्स जप्त केले. (Kirit Somayya on Uddhav Thackeray News)

या कारवाई केल्यानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somayya)हे आक्रमक झाले आहेत. सोमय्या यांनी आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री ठाकरे व त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. सोमय्या यांनी थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं.

Uddhav Thackeray, Kirit Somayya on Uddhav Thackeray and Havala king nandkishor chaturvedi Relation
जितेंद्र आव्हाडांना ईडीचा धसका ; म्हणाले, ''मी आत्महत्या करेल,''

''ईडीने काल जो व्यवहार समोर आणला आहे त्यानुसार ३० कोटी रुपयांचं मनी लॉन्डरिंग झालं आहे. सगळी प्रकरणे बाहेर आली तर उद्धव ठाकरेंची रात्रीची झोपही उडणार आहे. नंदकिशोर चतुर्वेदी (Nandkishor Chaturvedi)आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध काय,'' असा प्रश्न सोमय्यांनी उपस्थित केला आहे.

''2014 मध्ये एक शेल कंपनी स्थापन केली त्यात आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे संचालक आहेत. या कंपनीत उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी कधी मनी लॅाडरिंग केले आहे का? आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी स्थापन केलेली कंपनी आज हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मालकीची आहे, हा व्यवहार का झाला, कसा झाला,'' असा प्रश्न सोमय्यांनी केला आहे.

Uddhav Thackeray, Kirit Somayya on Uddhav Thackeray and Havala king nandkishor chaturvedi Relation
'ग्लोबल टीचर' डिसले गुरुजी अडचणीत ; शिस्तभंगाची कारवाई ?

सोमय्या म्हणाले, ''उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आर्थिक व्यवहारासंबंधी सर्व डिटेल्स आताच उघड करावेत. त्यामुळे तपास यंत्रणांचे काम वाचेल. 19 बंगले लपवण्याचा खूप प्रयत्न उद्धव साहेबांनी केला. 2019 मध्ये रश्मी ठाकरे म्हणतात बंगले माझे आहेत आणि आज उद्धव ठाकरे म्हणतात तिथे बंगलेच नाहीत. अशाच पद्धतीचा हा किस्सा आहे. श्रीधर पाटणकर आणि रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे आर्थिक व्यवहारांबाबत उद्धव ठाकरे बोलणार का?''

''कितीही घोटाळे केले तरी उद्धव ठाकरे हे कधीही राजीनामा देणार नाही,ते खुर्चीला पक्के चिटकून बसले आहेत.आम्ही घोटाळे बाहेर कडून महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडणार आहे,'' अशा इशारा त्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com