किरीट सोमय्यांनी सांगितले पुढचे टार्गेट

Kirit Somaiya | Sanajy Raut| कालच्या बुस्टर सभेनंतर आता आम्ही आग लावण्याचे काम करणार आहोत.
किरीट सोमय्यांनी सांगितले पुढचे टार्गेट
Kirit Somaiya

मुंबई : आजच मी दिल्लीत एका वरिष्ठ नेत्यांशी बोललो आहे. आता आम्ही सर्वजण अॅक्शन मोडमध्ये आलो आहोत.श्रीधर पाटणकर म्हणजे उद्धव ठाकरे यांचे साले आणि त्यांच्या आणखी एका बेनामी कंपनीच्या संपत्तीची माहिती मी दिली आहे. पाठपुरावा करण्यासाठी मी गुरुवार आणि शुक्रवारी दिल्लीला जाणार आहे. आता आदित्य आणी तेजस ठाकरे ,श्रीधर पटवर्धन यांच्या बेनामी कंपन्या, याच शेल कंपनीकडून आलेले पैसे हेच आमचे टार्गेट आहे, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

Kirit Somaiya
तेव्हा शिवसेना कुठे होती हे सुंदर सिंह भंडारींना विचारा : राऊतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

मुंबईत प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. कालच्या बुस्टर सभेनंतर आता आम्ही आग लावण्याचे काम करणार आहोत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे रोज उठून किरीट सौमय्याला घाबरून काहीही आरोप करत आहे. एक दिवस उद्धव ठाकरे सकाळी उठल्यावर त्या सोमय्या ग्राऊंडला देखील किरीट सोमय्या यांची संपत्ती असल्याचे दाखवून जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करु शकतात, असे कालच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे..

संजय राऊत डरपोक आहेत. उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरुन दुसऱ्यांकडून आरोप केले, किरीट सोमय्या नील सोमय्याला जेलमध्ये टाकायला निघाले होते. ५७ कोटींचा आरोप केला, पण एकही पुरावा दिला नाही. संजय राऊतांनी का एकही पुरावा दिला नाही. म्हणूनच संजय राऊत घाबरत आहेत. यांच्या संपत्ती जप्त होण्याची भिती आहे, म्हणून ते काहीही आरोप करत आहेत. आता मीच मुंबई पोलिसांना सांगणार आहे, संजय राऊतांना बोलावून त्यांच्याकडून ५७ कोटींचे कागदपत्र मागवून घ्या अशी मागणी करणार आहे. म्हणून माझ्या पत्नीने नोटीस दिली आहे. दोन दिवसात माफी नाही मागितली तर त्यांच्यावर आम्ही मानहानीचा दावा करणार असल्याचा इशाराही किरीट सोमय्यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.