किरीट सोमय्यांचे 'हे' आहेत पुढील तीन टार्गेट..

राऊतांनी स्वत:च्या स्वार्थासाठी हे सर्व आरोप केलेले आहेत. त्यांच्या आरोपांना भाजप दमडीचीही किंमत देत नाही.
Kirit Somayya Latest News | Kirit Somayya News | Sanjay Raut News
Kirit Somayya Latest News | Kirit Somayya News | Sanjay Raut Newssarkarnama

राजगुरुनगर (पुणे) : शिवसेनेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेत भाजप (BJP) नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर सोमय्यांनी त्यांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तर दिले.

किरीट सोमय्या म्हणाले, ''राऊतांनी स्वत:च्या स्वार्थासाठी हे सर्व आरोप केलेले आहेत. त्यांच्या आरोपांना भाजप दमडीचीही किंमत देत नाही.राऊत जे आरोप करतात त्याची तक्रारही करत नाही, मुख्यमंत्र्यांनाही पत्र देत नाही आणि गुन्हाही दाखल करत नाही आणि या सर्व आरोपांचे न्यायालयही दखल घेत नाही,'' (Kirit Somayya News Updates)

Kirit Somayya Latest News | Kirit Somayya News | Sanjay Raut News
मुंडे, ED ची चिंता करु नका, तुमची खासगी CD निघाली तर वांदे होतील ; राणेंनी डिवचलं

''संजय राऊत आरोप करतात मात्र, एक कागद आणि पुरावे हातात नाही. त्यात मुंबई पोलिसांच्या चौकशीतही बाहेर आले किरिट सोमय्यांनी काहीच केलं नाही. शंभर वेळा खोटं बोललं कि लोकांना खरं वाटवं म्हणून राऊत आरोप करतात त्यामुळे राऊतांच्या आरोपाची दखल घेत नाही. पंधरा वर्ष नाही तर मागच्या दोन वर्षात पुढे आलेले घोटाळे आहेत. शिवसेना सोबत असताना शिवसेनेचे घोटाळे कोणी सांगितले असते तर बाहेर काढले असते,'' असे राऊत म्हणाले.

''भष्ट्राचाराचे घोटाळे बाहेर काढताना शिवसेना ,राष्ट्रवादी पक्ष म्हणून नाही..! माफीयागीरी करुन घोटाळेबाजांच्या विरोधातला हा लढा आहे. राऊतांनी पंतप्रधानाना पत्र लिहिले आहे. हे काय पुरावे आहेत का? 3 हजार 100 पानी पत्र म्हणजे काय पुरावे का, तीच पत्र मुख्यमंत्र्यांना पण लिहिलीत मग मुख्यमंत्री का कारवाई करत नाही,'' असे राऊतांनी सांगितले.

Kirit Somayya Latest News | Kirit Somayya News | Sanjay Raut News
नरके म्हणाले, ''ओबीसी थँक्सलेस केस ; आरक्षण रद्द करण्यासाठी कोण एवढा खर्च करतेय?

''सोमय्यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना आवाहन दिले आहे. ते म्हणाले, ''आदित्य ठाकरेंनी गुन्हा दाखल करण्यासाठी आदेश दिले त्याला अडीच महिने झाले त्याचे काय झाले. त्यांच्याकडे पुरावे नाही. ते नुसत्या धमक्या देतात. त्यांनी संपूर्ण सोमय्या परिवारावर कारवाई करावी,'' असे सोमय्यांनी सांगितले ''

यावेळी सोमय्यांनी आपल पुढील तीन टार्गेट सांगितले. मुंबई महानगरपालिका एसआरए (SRA)घोटाळा, महापौर किशोरी पेडणेकर आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या भष्ट्राचार बाहेर काढणार असल्याचे किरिट सोमय्यांनी स्पष्ट केले.

''महाराष्ट्राला माफीया मुक्त करण्यासाठी माझा लढा सुरु आहे. यामध्ये मला ईडीचा (ED) एजंट म्हणत असतील तर मी हसत हसत पुढे जाणार," असे सोमय्यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com