परबांचा रिसॉर्ट तुटणारच; सोमय्या हातोडा घेऊन दापोलीत दाखल

शिवसेनेचे (Shivsena) नेते अनिल परब (Anil Parab) यांच्यामागे दापोली येथील साई रिसॉर्टच्या जमीन खरेदी व बांधकामाप्रकरणी चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे.
Anil Parab, Kirit Somaiya
Anil Parab, Kirit Somaiyasarkarnama

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) नेते अनिल परब (Anil Parab) यांच्यामागे दापोली येथील साई रिसॉर्टच्या जमीन खरेदी व बांधकामाप्रकरणी चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे. भाजप (BJP) नेते माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी या प्रकरणी तक्रार केली होती. आता तर परब यांच्या मालकीच्या रिसॉर्टवर प्रशासनाने कारवाई करावी यासाठी सोमय्या दापोलीत दाखल झाले आहेत. त्यामुळे परबांचे रिसॉर्ट जमीनदोस्त होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

किरीट सोमय्या यांच्याबरोबर शेकडो कार्यकर्ते दापोलीत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी चलो दापोली, तोडो रिसॉर्टचा नारा दिला होता. घरातून निघण्यापूर्वी सोमय्या यांच्या हातात हातोडाही होता. हातोडा हा जनतेच्या भावनेचे प्रतिक आहे. जर हे रिसॉर्ट पाडले नाही तर आज ना उद्या अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना तुरुंगात जावे लागेल, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

Anil Parab, Kirit Somaiya
करुणा मुंडेंना त्यांच्याच कार्यकर्त्यांनी लावला 30 लाखांना चुना : तीन जणांवर गुन्हा दाखल

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशावर सही केली आहे. सध्या पर्यावरण मंत्रालयाकडे ही फाईल आहे. ते रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देणार आहे. या प्रकरणी पुढच्या आठवड्यात जिल्हाधिकारी त्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले आहे. दिवाळीपर्यंत परब यांचे रिसॉर्ट इतिहासजमा होईल, असा दावा सोमय्या यांनी केला आहे.

परब यांचे साई रिसॉर्ट हे बेकायदेशीर आहे. या रिसॉर्टच्या बांधकामात काळ्या पैशांचा वापर करण्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने हा रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याने ३१ जानेवारी २०२२ रोजी हा रिसॉर्ट ९० दिवसांत तोडण्याचे आदेश दिले होते. मात्र, ९० दिवस पूर्ण होऊनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही.

Anil Parab, Kirit Somaiya
पिंपरी महापालिकेत भाजपने भ्रष्टाचाराचा विक्रम केला; राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गव्हाणेंचा हल्लाबोल

दापोली रिसॉर्ट प्रकरणी याआधी परब यांची ईडीने चौकशी केली होती. परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर ईडीने २७ मे रोजी छापेमारीही केली होती. ईडीने मुंबईसह पुणे व रत्नागिरी अशा एकूण सात ठिकाणी छापे टाकले होते. माझा व्यवहार अतिशय पारदर्शक आहे. ज्यांनी रिसॉर्ट बांधले त्यांनी त्याची जबाबदारी घेतलेली आहे. सर्व कागदपत्रे तपास यंत्रणांना देण्यात आली आहे. यंत्रणा चौकशी करेल व त्यातून सत्य बाहेर येईल, असे अनिल परब यांनी सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com