राऊतांचा सलग दुसरा बॉम्ब; 'मोतीलाल ओसवाल' कंपनीकडून सोमय्यांच्या प्रतिष्ठानला देणगी

Sanjay Raut | kirit Somaiyaa : संजय राऊतांच्या आरोपांवर सोमय्या काय उत्तर देणार?
राऊतांचा सलग दुसरा बॉम्ब; 'मोतीलाल ओसवाल' कंपनीकडून सोमय्यांच्या प्रतिष्ठानला देणगी
Sanjay Raut, Kirit SomaiyaSarkarnama

मुंबई : भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या युवक प्रतिष्ठानला संशयास्पद देणग्या येत आहेत. ज्या कंपन्यांवर ईडी, सीबीआय या तपास यंत्रणांचे छापे पडत आहेत, त्याच कंपन्यांकडून प्रतिष्ठानच्या खात्यात संशयास्पदरित्या पैसे ट्रान्सफर होत आहेत. पश्चिम बंगालच्या मेट्रो डेअरीवर ईडी सीबीआयने छापेमारी केली होती. त्याच मेट्रो डेअरीमधून सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानच्या खात्यावर लाखो रुपये ट्रान्सफर झाले आहेत, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी (१० मे) रोजी केला होता.

(Sanjay Raut And kirit Somaiya Latest News)

त्यानंतर आज राऊत यांनी या आरोपांच्या मालिकेतील सलग दुसरा बॉम्ब फोडला आहे. ते म्हणाले, सोमय्या स्वतःला भ्रष्टाराचाराचे विरुद्ध लढ्याचे प्रमुख आधारस्तंभ मानतात. पण आज मी त्यांचा खरा चेहरा समोर आणणार आहे. ‘किरीट सोमय्या यांनी नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड (NSEL) मध्ये मोतीलाल ओसवाल आणि कंपनी या शेअर बाजार कंपनीत ५ हजार ६०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. या कंपनीची चौकशी करा अशी मागणी केली होती.

Sanjay Raut, Kirit Somaiya
मनसे विरोधातील कारवाईची धार कमी होणार? बाळा नांदगावकर मैदानात; भेटीगाठींना वेग

त्यानंतर या प्रकरणाची चर्चा व्हावी म्हणून सोमय्या स्वतः या कंपनीच्या एका शिपायाच्या घरी गेले. तिथं त्यांनी बराच तमाशा केला. त्यानंतर सक्तवसुली संचालनालयानं (ED) या प्रकरणाची चौकशी केली. मात्र या सगळ्या दरम्यान २०१८ आणि २०१९ मध्ये किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मोतीलाल ओसवाल या कंपनीकडून सलग दोन वर्षे लाखो रुपयांची देणगी मिळाली, असा आरोप राऊत यांनी केला आहे. तसेच युवक प्रतिष्ठान हे ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा उद्योग आहे, असाही आरोप त्यांनी केला.

ज्या कंपन्यावर ईडी सीबीआयचे छापे पडत आहेत त्या कंपन्यांकडून सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानच्या खात्यावर लाखो, कोटी रुपयांच्या देणग्या ट्रान्सफर करण्यात आल्या आहेत. अशा एकूण १७२ कंपन्या आहेत. सोमय्या एक प्रकारे खंडणी उकळण्याचे काम करत आहेत. भ्रष्टाचारविरोधी मुखवटा घालून किरीट सोमय्या अशाच प्रकारे पैसे उकळत आहेत. तर हे लोक भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र कसा करतील? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. तर अशा लोकांना पाठीशी घालून देवेंद्र फडणवीस यांचीही प्रतिष्ठा डागाळली असल्याचा टीका संजय राऊत यांनी केली आहे.

Sanjay Raut, Kirit Somaiya
सोमय्यांचे पश्चिम बंगाल कनेक्शन: राऊतांनी केलं उघड

राऊत म्हणाले, या सगळ्याच्या चौकशीची मी धर्मादाय आयुक्त, आर्थिक गुन्हे विभागाकडे मागणी केली आहे. आता ईडीलाही मागणी करणार आहे. हा राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीचा विषय आहे. ही एक प्रकारची खंडणी आहे. किरीट सोमय्या यांचा चेहरा उघड झाला आहे. यांचा खेळ संपला रोज हे प्रकरण येणार. सुरुवात त्यांनी केली शेवट आम्ही करू. भाजपच्या २८ लोकांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण आहेत ते बाहेर काढू, असाही इशारा राऊत यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.